Full Width(True/False)

जगातील पहिला ब्लड सेन्सरचा फीचर फोन Pulse 1 लाँच, किंमत १९९९ ₹

नवी दिल्लीः होम ब्रँड हँडसेट मेकर लावाने आज आपला लेटेस्ट फीचर फोन Pulse 1 लाँच केला आहे. हा फीचर फोन जगातील पहिला कॉन्टॅक्टलेस टॉकिंग थर्मामीटर फोन असल्याची दावा कंपनीने केला आहे. युजर्संना विना टच करता टेम्परेचर मोजता येणार आहे. लावाच्या या फीचर फोनची किंमत १ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. वाचाः लावाच्या या फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनला पॉलिकार्बनेट बॉडी दिली आहे. या फोनमध्ये टॉर्च, व्हीजीए कॅमेरा आणि ३२ जीबी पर्यंत मेमरी वाढवण्याची क्षमता दिली आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 1800mAh बॅटरी दिली आहे. तसेच ग्राहकांना या फोन खरेदीवर १ वर्षाची रिप्लेसमेंट सर्विस मिळणार आहे. या फीचर फोनमध्ये नंबर टॉल्कर फीचर, कॉन्टॅक्टसाठी फोटो आयकॉन दिले आहेत. वायरलेस एफएम सोबत रेकॉर्डिंग आणि ड्यूल सीम सपोर्ट दिला आहे. वाचाः लावाच्या या फोनमध्ये ऑटो कॉल रेकॉर्डिंग सोबत ७ भाषेचा सपोर्ट दिला आहे. यात इंग्रजी, हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगु, गुजराती आणि पंजाबी भाषेचा समावेश आहे. लावाच्या या फीचर फोनची किंमत १ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. गोल्ड कलरमध्ये हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे. ऑनलाइन पोर्टल फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर तसेच ऑफलाइन वर हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यात युजर्संना त्यांच्या शरिराचे तापमान मोजता येणार आहे, ततसेच ब्लड प्रेशर घरच्या घरी मोजता येवू शकणार आहेत तेही विना थर्मामीटर, अशी माहिती लावा इंटरनॅशनलचे हेड प्रोडक्ट तेजिंदर सिंग यांनी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37LDm98