मुंबई- च्या आयुष्यात काय चालले आहे हे ती तिच्या इन्स्टा स्टोरीवरून तिच्या चाहत्यांना सतत सांगत असते. काही दिवसांपूर्वी तिला करोनाची लागण झाली होती. यानंतर तिने स्वतःला सेल्फ क्वारन्टीन केलं होतं. स्वतःची योग्य काळजी घेतल्यानंतर ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. या संबंधीची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर दिली. घरातून बाहेर पडण्याची परवानगी मिळाल्यानंतर ती सर्वातआधी सलॉनमध्ये गेली. आता तिने अजून एक इन्स्टा स्टोरी शेअर केली ज्यात तिने डेट नाईटचा उल्लेख केला आहे. फ्रेण्डसोबत मलायकाची डेट नाईट इन्स्टाग्रामवर मलायकाच्या स्टोरीजकडे अनेकांचं आवर्जुन लक्ष असतं. तिने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये सुंदर पद्धतीने सजवलेलं डिनर टेबल दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने 'डेट नाइट' एवढंच लिहिलं. दुसर्या फोटोत मलायकाने बॅकलेस गाउनमधला फोटो शेअर केला. या दोन्ही फोटोंवरून चाहत्यांची नजर हटत नाहीए. मलायकाची ही डेट तिच्या एका मैत्रिणीसोबत होती. सलॉन सेशन नंतर ट्रोल झाली होती मलायका अरोरा नुकतीच मलायका सलॉनमध्ये जाताना दिसली होती. छायाचित्रकारांनी तिचे सलॉन सेशनचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर मलायकाला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ngysq7