मुंबई- केसमध्ये तपासणी करणाऱ्या एम्सच्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने आपला रिपोर्ट सीबीआयकडे सुपूर्त केला आहे. या फॉरेन्सिक टीमने आपल्या अखेरच्या रिपोर्टमध्ये सुशांतचा मृत्यू आत्महत्येनेच झाल्याचं म्हटलं आहे. एम्सच्या एक्सपर्ट पॅनेलचे हेड डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा गळा दाबून हत्या करण्याच्या संभावलेला धुडकावून लावलं आहे. शरीरावर कोणतीही जखम नाही एएनआयच्या रिपोर्टनुसार, एम्सचे फॉरेन्सिक हेड डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केलं की, 'आम्ही फायनल रिपोर्टची तयारी केली आहे. ही पूर्णपणे गळफास लावण्याचं आणि आत्महत्येचं प्रकरण आहे. सुशांतच्या शरीरावर गळफासशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी जखमा नव्हत्या. तसेच शरीर आणि कपड्यांसोबत कोणताही संघर्ष झालेलाही दिसला नाही.' शरीरात कोणतेही विषारी किंवा मादक पदार्थ आढळले नाही एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने त्यांच्या तपासाबाबत टीमशी दीर्घकाळ चर्चा केली. डॉ. गुप्ता पुढे म्हणाले की, 'बॉम्बे टॉक्सिक सायन्स लॅब तसेच टॉक्सिकोलोजी लॅबमध्ये सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी पदार्थ आढळले नाही. गळ्यावर असलेलाडाग हा गळफासामुळेच होता. यापूर्वी सुशांतचं शवविच्छेदन करणार्या कूपर इस्पितळाच्या पॅनेलने सुशांतचा मृत्यू आत्महत्यनेच झाल्याचं म्हटलं होतं. असं असलं तरी मेडिकल बोर्डाने याहून जास्त माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. हत्येच्या अँगलमधून केला जात होता तपास सुशांतचे कुटुंबिय, मित्र आणि चाहते सीबीआयच्या चौकशीत उशीर झाल्याबद्दल निराशा व्यक्त करत आहेत. तसेच या घटनेची चौकशी आत्महत्येच्या अँगलने नाही तर खुनाच्या दृष्टीने करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करत होते. सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलांनीही या प्रकरणाच्या चौकशीत होत असलेला उशीर पाहून नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सीबीआय, ईडी आणि नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरोमार्फत होत आहे. आतापर्यंत रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांच्यासह अनेक ड्रग्ज डीलर्सना अटक करण्यात आली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cVdQ1H