मुंबई- नुकतीच बिग बॉस १४ च्या घराबाहेर आली. जर तिच्या इन्स्टाग्रामवर एक नजर चाकली तर तिची संपूर्ण जीवनशैली कशी आहे याचा अंदाज येतो. यावरूनच ती खासगी आयुष्यात खूप खर्च करत असणार यात काही शंका नाही. ती चाहत्यांसाठी तिच्या घरातील अनेक मजेशीर पोस्टही शेअर करत असते. नुकताच तिने वडिलांसोबतच्या संभाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. वडील म्हणाले - लॉकडाउनमध्ये पैसे वाचवा हिना आणि तिच्या वडिलांचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे. दोघं एकमेकांसोबत मित्रांसारखेच राहतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये हिनाचे वडील तिच्याशी बचतीबद्दल बोलत होते. या व्हिडिओमध्ये हिना वडिलांना बोलते की तिच्याकडे कोणतेही डेबिट, क्रेडिट कार्ड नाहीएत. तुम्ही माझे सर्व कार्ड ब्लॉक केले. यावर उत्त देताना वडील म्हणतात की, ब्लॉक केले नाहीएत तर बंद केले आहेत. लॉकडाउनची वेळ असल्यामुळे पैसे बचतीकडेही लक्ष दिलं पाहिजे. जेवढा पैसा जमा करू शकतेस तेवढा कर. वडील म्हणाले- कॉफीसाठी दररोज पैसे देत जाईन हिना खान बाबांना म्हणाली की, 'तुम्ही सर्व कार्ड ब्लॉक करू शकत नाही, मी शॉपिंग कशी करू, मला कॉफी पिण्यासाठी तरी पैसे लागतील ना.. मी कॉफी विकत कशी घेऊ..' यावर तिचे बाबा म्हणतात की, ते हिनाला दररोज २०० रुपये कॉफीसाठी देतील. त्याहून जास्त पैसे लागत नाहीत. जेवढी रोख रक्कम लागेल तेवढी मी दररोज देत जाईन.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TGJqHW