मुंबई- बिग बॉसच्या घरात राहुल वैद्यने जान कुमार सानूला घराणेशाहीवरून टोमणे दिले होते. यानंतर घरातील स्पर्धक जानच्या बाजूने उभे राहिले होते. आज बिग बॉस विकेण्ड का वारमध्ये राहुलची शाळा खेळताना दिसत आहेत. सलमान खान स्टेजवर आल्यावर गेल्या आठवड्याभरात घरात ज्या काही घटना घडल्या त्यावर आपलं मत व्यक्त करत आहे. तसेच घरातल्यांना कोण कोणाचं पपेट आहे असा प्रश्न विचारला. बिग बॉसने रुबीना दिलैकला घराचं 'पपेट' घोषित केलं. निक्की तांबोळी आणि पवित्र पुनिया यांनी अभिनव शुक्लाला रुबीना दिलैकचं 'पपेट' म्हटलं. तर एजाज खानने निशांत मलकानी आणि अभिनवचं नाव घेतलं. तर नयना सिंहने तिला घरात कोणीही कोणाचं पपेट नसल्याचं सांगितलं. रुबीनाने जान आणि राहुलचं नाव घेतलं. राहुलने जास्मिन आणि अभिनव हे रुबीनाचं पपेट असल्याचं सांगितलं. राहुल वैद्यला घरातील खलनायक घोषित करण्यात आलं. सलमानने यानंतर राहुलशी घराणेशाहीबद्दल चर्चा केली. यात त्याने सिनेसृष्टीतील काही नावाजलेल्या कलाकारांचीही नावं घेतली. यासोबतच प्रत्येकजण मेहनतीने मोठा होतो ही गोष्ट सलमानने पुन्हा एकदा स्पष्ट केली. राहुलप्रमाणेच जान आणि घरातील इतर स्पर्धक त्यांच्या मर्जीने आणि त्यांच्या नावाने घरात आले आहेत. सलमानने कविताला आणि शार्दुलला घरातील वातावरणाबद्दल विचारले. धमकावण्याच्या मुद्द्यावर सलमान खान स्पर्धकांशी बोलतो. यावेळी तो जास्मीनला संपूर्ण आठवड्यात ती किती चुकीचा खेळ खेळली याची जाणीव करून देतो. यावेळी सलमान राहुलचं समर्थन करतो.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31Z0SvN