मुंबई टाइम्स टीम काही दिवसांपूर्वी अभिनेता आणि मुख्य भूमिकेत असणारा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ''चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. पण, ट्रेलर प्रदर्शित होताच त्याला किती लाइक्स आणि डिसलाइक मिळाले हे प्रेक्षकांना पाहता येत नाहीय. सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा वाद पेटून उठलाय. त्यामुळे स्टारकिड्स आणि बड्या कलाकारांवर जोरदार टीका होत आहे. यापूर्वी 'सडक २'च्या ट्रेलवर डिसलाइक्सचा भडिमार नेटकऱ्यांनी केला होता. तसंच इशान खट्टरच्या 'खाली पिली' या चित्रपटाच्या ट्रेलवरही डिसलाइक्सचा भडिमार करण्यात आला. आता अक्षयचा आगामी चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर प्रदर्शित होताच युट्यूबवर त्याचे लाइक्स आणि डिसलाइक्स हाइड करण्यात आले आहे. ट्रेलर पाहताना तुम्ही तो लाईक किंवा डिसलाइक करु शकता. पण, एकूण किती जणांनी ट्रेलर लाइक किंवा डिसलाइक केला हा आकडा लपवण्यात आला आहे. यानंतर चाहत्यांनी संताप आणि रोष व्यक्त केला आहे. स्पर्धा करायची असेल ती उघड पणे करता यायला हवी, असं करणं चूकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बहिष्कार घालण्याची मागणी हा हॅशटॅग सोशल मीडियावर चालवला जात आहे. आता या व्हिडीओ काय आहे; हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगायचं झालं, तर अमली पदार्थांच्या सेवन प्रकरणी बॉलिवूडमधील मोठी नावं पुढे आली. या पार्श्वभूमीवर अक्षयनं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून अक्षय पहिल्यांदा बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर बोलला होता. पण, हीच प्रतिक्रिया अक्कीला महागात पडली आहे. 'बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचं सेवन केलं जात नाही, असा दावा मी करणार नाही. ती गोष्ट आहे. पण, म्हणून सगळेच यात सामील असतील, असा याचा अर्थ नाही', असं अक्षय या व्हिडीओत म्हणाला होता. त्याच्या या व्हिडीओला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला होता. यात करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, अंगद बेदी अशा अनेकांचा समावेश होता. नेटकऱ्यांनी मात्र याच व्हिडीओवरून अक्कीच्या सिनेमाला विरोध करत त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. येत्या दिवाळीमध्ये 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'कंचना' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34NgaEf