नवी दिल्लीः गुगलचा लेटेस्ट स्मार्टफोन ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हा फोन सेलमध्ये केवळ ३० मिनिटात आउट-ऑफ-स्टॉक झाला आहे. कंपनीने या फोनला फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये उपलब्ध केले होते. या सेलमध्ये कंपनीचे किती युनिट विकले याची माहिती कंपनीने दिली नाही. युजर्सचा उदंड प्रतिसाद पाहून कंपनी पुन्हा एकदा स्मार्टफोनचा सेल ऑफर करणार आहे. वाचाः फोनची खास वैशिष्ट्ये २९ हजार ९९९ रुपये किंमत असलेल्या या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 730G SoC प्रोसेसर वर काम करतो. या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट दिला नाही. या फोनमध्ये ५.८१ इंचाचा फुल एचडी प्लस ओलेड डिस्प्ले दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १२.२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3,140mAh ची बॅटरी दिली आहे. फोनला फास्ट चार्जिंग साठी यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये यूएसबी टाइप-C पोर्ट सोबत ब्लूटूथ 5.0, 4G VoLTE, वाय-फाय 802.11ac आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. हा फोन केवळ ब्लॅक कलरमध्ये येतो. फोन अँड्रॉयड १० ओएसवर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31cLk7i