नवी दिल्लीः जगातील सर्वात मोठा मेसेजिंग अॅप आपल्या प्लॅटफॉर्मवर खूप सारे नवीन फीचर्स जोडत आहे. गेल्या काही आठवड्यात ऑलवेज म्यूट बटन, न्यू स्टोरेज यूसेज आणि कॅटलॉग शॉर्टकट सारख्या फीचर्स संबंधी ऐकायला मिळाले आहे. आता काही नवीन फीचर्स आहेत जे लकवर Whatsapp वर येणार आहेत. च्या एक रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप आपल्या अँड्रॉयड अॅपसाठी नवीन एनिनमेटेड स्टिकर पॅक जारी करणार आहे. वाचाः नवीन स्टिकर सर्च फीचर या स्टिकर पॅकचे नाव Baby Shark आहे. याची साईज ३.४ एमबी इतकी असणार आहे. नवीन स्टिकर पॅक शिवाय लवकरच हे अॅप स्टिकर सर्च फीचर येणार आहेत. या फीचर द्वारे व्हॉट्सअॅप युजर्सला अॅप मध्ये स्टिकर सर्च करण्याची सुविधा मिळणार आहे. जीफ फाइल्स सर्च करतेय त्याप्रमाणे ही सुविधा असणार आहे. वाचाः रिपोर्टच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपने काही निवडक युजर्ससाठी हे फीचर जारी केले आहेत. ज्यांना हे फीचर मिळणार आहे. त्यांना अॅपच्या स्टीकर पर्यायात नवीन सर्च आयकॉन दिसतील. हळू हळू हे फीचर सर्व युजर्स पर्यंत पोहोचणार आहे. वाचाः नवीन इन अॅप सपोर्ट याशिवाय व्हॉट्सअॅप मध्ये नवीन इन अॅप सपोर्ट फीचर येत आहे. याद्वारे युजर्सना काही समस्या येत असल्यास या अॅपच्या अधिकृत सपोर्ट टीम सोबत व्हॉट्सअॅप चॅट द्वारे कम्यूनिकेट करू शकतील. WhatsApp Support Chat एक अधिकृत चॅट असणार आहे. तसेच दुसऱ्या चॅट्सप्रमाणे यात अँड टू अँड इनस्क्रिप्शनची सुविधा मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nYb5BV