नवी दिल्लीः सीरीजच्या स्मार्टफोन युजर्सला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने भारतात एका आठवड्यात या सीरीजचे २ लाखांहून जास्त स्मार्टफोनची विक्री केली आहे. कंपनीने रियलमी नार्जो २० सीरीजला मिळालेल्या प्रतिसादची माहिती ट्विटरवर दिली आहे. वाचाः माधव सेठ यांनी दिली माहिती रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्विटमध्ये या सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोनच्या विक्रीची माहिती दिली आहे. यात म्हटले की, एका आठवड्यात १, ३०, ००० हून अधिक जास्त रियलमी नार्जो २० विकले गेले आहेत. तर रियलमी नार्जो २० प्रो ची ५० हजारांहून अधिक आणि नार्जो २० ए ची ५१ हजारांहून अधिक फोनची विक्री झाली आहे. वाचाः रियलमी नार्जो २० सीरीजचे वैशिष्ट्ये रियलमी नार्जो २० ए मध्ये एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत स्नॅपड्रॅगन ६६५ एसओसी प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वनीला व्हेरियंटमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 6000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः नार्जो २० प्रो सीरीजचा सर्वात महाग फोन आहे. यात मीडियाटेक हीलियो जी ९५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ९० एचझेड रेट सोबत ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. ६५ वॉटची सुपरडार्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jm0def