मुंबई: बॉलिवूड अभिनेता यानं लॉकडाऊन दरम्यान केलेल्या कामाचं कौतुक होत आहे. मोठ्या पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र हिरो ठरला आहे. लॉकडाउनच्या काळात त्यानं हजारो गरीब, गरजूंना केलेल्या मदतीची वाहवा होतेय. फक्त भारतातूनच नाही परदेशातूनही त्याचे चाहते कौतुक करताना दिसतायत. सोनूला थेट पाकिस्तानमधून एक क्युट मेसेज आलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानील एका चिमुकल्याचा 'पीछे तो देखो' हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओमुळं हा चिमुकला रातोरात स्टार झाला. हा चिमुकला आहे . अहमदचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय. या व्हिडिओत तो सोनू सूदच्या कामाचं कौतुक करताना दिसतोय. काय म्हणतोय अहमद या व्हिडिओत? 'हॅलो सोनू सूद सर, कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे. मी अहमद शाह आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम. तुम्ही खूप चांगलं काम करताय. आय लव्ह यू. आनंदी राहा. बाय', असं अहमदनं त्याच्या व्हिडिओत म्हटलं आहे. दरम्यान, सोनू सूदच्या मदतकार्याची दखल संयुक्त राष्ट्रसंघानंही घेतली आहे. सोनूच्या कामाचा गौरव करत 'संयुक्त राष्ट्रसंघानं' त्याचा विशेष सन्मान केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून त्याला ' ' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. सोनू सध्या त्याच्या समाजकार्यामुळे खूप चर्चेत आहे. रिअल लाईफ हिरो म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. लॉकडाउनमध्ये गावी जाणाऱ्या हजारो श्रमिकांसाठी सोनूनं मदतीचा हात पुढे केला. गरीब लोकांना अन्नवाटप केलं. तसंच परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. काहींना वैद्यकीय मदत तर श्रमिकांना रोजगार मिळवून देण्यासाठीही तो प्रयत्नशील होता. सोनूचं समाजकार्य अजूनही सुरू आहे. त्याच्या या कार्याची दखल देशातच नाही, तर विदेशातदेखील घेतली गेली आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना सोनू म्हणाला, 'मी जे काही केलं ते माझ्या देशवासीयांसाठी केलं. हे करताना माझी कोणतीही अपेक्षा नव्हती.' आजही सोनूचं मदतकार्य विविध प्रकारे सुरूच आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36lAxLl