Full Width(True/False)

Bigg Boss 14: पुन्हा चढणार सलमानचा पारा, राहुल होणार का सेफ?

मुंबई- '' सीझनच्या चौथ्या आठवड्यात अनपेक्षित वळण आलं जेव्हा कविता कौशिक आणि निशांतसिंग मल्खानी यांना एकाचवेळी बाहेर काढण्यात आलं. घरातील स्पर्धकांनी बहुमताने निशांतला घराबाहेर काढलं तर प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे कवितालाही घराबाहेरचा रस्ता पकडावा लागला. प्रेक्षकांनी लव्हबर्ड्स एजाज खान आणि पवित्र पुनिया यांच्यातलं कट्टर वैर पाहिलं. एजाजने आपल्या कर्णधारपदाचा वापर करून जास्मीन भसीनला सुरक्षित केलं. तर बिग बॉसनेही अली गोनीला नवीन स्पर्धक म्हणून याच आठवड्यात घरात प्रवेश दिला. अलीचा घरात येण्याचा निर्णय घाईत घेतल्यामुळे त्याला १४ दिवस घरातील एका रूममध्ये क्वारन्टीन करण्यात आलं आहे. १४ दिवसांचा काळ संपल्यावर अली स्पर्धकांसोबत खेळेल. या आठवड्यात , शार्दुल पंडित आणि नयना सिंह हे तीन स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात, बिग बॉसने रेड झोनमधील स्पर्धकांना स्वतःला सुरक्षित करण्याची एक संधी दिली. पण यात चारपैकी तीनजणांनाच टास्कमध्ये सहभागी होता येणार होतं. दरम्यान, जास्मीनने राहुलला संधी न देता उरलेल्या तीनजणांना अर्थात रुबिना, नयना आणि शार्दुल यांना स्वतःला सुरक्षित करण्याची संधी दिली. यात रुबीना सेफ झाली. सलमान घरातील स्पर्धकांना एकमेकांबद्दलच्या वाईट गोष्टी सांगायला सांगतो. यावर पवित्र पुनियाने नयना सिंहबद्दल, रुबीना दिलैकने शार्दुल पंडितबद्दल, अभिनव शुक्लाने एजाज खानबद्दल, जस्मीन भसीनने जान कुमार सानूबद्दल, निक्की तांबोळीनेही नयना सिंहबद्दल, जानने जास्मीनबद्दल, इजाजने शार्दुलबद्दल तर नयनाने शार्दुलबद्दल न पटणाऱ्या गोष्टी सांगितल्या. सलमानने शोच्या सुरुवातीला स्पष्ट केलं की आजचा एपिसोड हा मनोरंजनाने भरपूर असणार आहे. आज तो कोणाचाही मूड ऑफ करणार नाही. यावेळी सलमान बोलतो की अली गोनीमुळेच भारतात लँडलाइन पुन्हा प्रसिद्ध झाला आहे. यानंतर अली आणि निक्की एकमेकांसोबत फ्लर्ट करताना दिसतात. यावेळी रेमो डिसूजा, शक्ति मोहन, पुनीत पाठक, सलमान युसुफ यांचं बिग बॉसच्या स्टेजवर स्वागत करतो. सलमान सर्व पाहुण्यांची स्पर्धकांशी ओळख करून देतो आणि सर्व मिळून स्पर्धकांशी संवाद साधतात. घरातील सहकारी आणि सलमान खान आणि सर्व पाहुणे उन्हाळ्याच्या गाण्यावर नाचतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38lDCMs