Full Width(True/False)

होणाऱ्या सासूने गौहर खानसाठी लिहिला खास मेसेज, झाला व्हायरल

मुंबई- अभिनेत्री गौहर खानने इस्माईल दरबार यांचा मुलगा आणि सोशल मीडिया स्टार झैद दरबारसोबत साखरपुडा झाल्याचं सांगितलं. दोघं लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या बातमीनंतर दोघांच्याही चाहत्यांमध्ये एक आनंदाची लाट पसरली. आहे. गौहरप्रमाणे झैदचं कुटुंबही नव्या सुनेच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. झैदची आई अम्मी फरजान यांनी सुनेचं गौहरचं कुटुंबात स्वागत करण्यासाठी एक छानसी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये गौहर आणि फरजान एकमेकींसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. फरझाना यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर गौहरच्या वाढदिवसाच्या पार्टीतला एक फोटो शेअर केला. यात त्या गौहरला किस करताना दिसत आहेत. या पोस्टला प्रेमळ मेसेज लिहिताना फरजाना यांनी लिहिले की, 'आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे. आणि गौहर यांचे अभिनंदन. माझे आशीर्वाद, प्रेम आणि समर्थन तुमच्या दोघांसोबत नेहमीच राहिल.' २४ डिसेंबरला झैद आणि गौहर लग्न करणार असल्याच्या चर्चा गौहरने या गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी साखरपुडा झाल्याचं सांगितलं. यानंतर ती डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली. २४ डिसेंबर रोजी मुंबईतील एका हॉटेलमध्ये पारंपरिक पद्धतीने दोघं विवाह करतील असं म्हटलं जात आहे.हा लग्न सोहळा दोन दिवसांचा असेल. 'बिग बॉस १४' मधून परत आल्यानंतर आणि झैद दरबार गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी प्री-वेडिंग शूट केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ezqdRU