मुंबई: कॉमेडी क्विन अशी ओळख असलेल्या हिच्या घरी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी छापा टाकला. छापा टाकल्यानंतर एनसीबीला तिच्या घराच मिळाल्यानं तिला आणि तिचा पती यांना अटक करण्यात आली आहे. भारती आणि हर्ष दोघांनी देखील ड्रग्जचं सेवन करत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज दोघांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून थोड्याच वेळात त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. शनिवारी म्हणजे काल भारती आणि हर्ष यांची एनसीबीनं अनेक तास चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान दोघांनीही गांजा सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. कोण आहे भारती सिंह? २००८ मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या चौथ्या सीझनमध्ये भारतीने भाग घेतला. यानंतर तिचं आयुष्य पुरतं बदलून गेलं. या शोमध्ये भारतीने 'लल्ली' नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत 'लाफ्टर क्वीन' म्हणून राज्य करत आहे. अर्जुन रामपालच्या घरी छापेमारी ९ नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालच्या घरी छापेमारी दरम्यान एजन्सीने लॅपटॉप, मोबाइल फोन आणि टॅबलेट सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या. यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती. रामपालच्या घरावर छापा टाकण्याच्या एक दिवस अगोदर एनसीबीने बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाची पत्नी यांनाही त्यांच्या जुहू येथील घरातून अटक केली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35SGheV