मुंबई- व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत आहे असं वाटत असतानाच अनेक ठिकाणी नवनवीन रुग्ण आढळत आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले, तर हजारोंनी या विषाणूवर मातही केली. दरम्यान चा ड्रायव्हर अशोक यायची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. या रिपोर्टनंतर सलमानने १४ दिवसांसाठी स्वतःला इतरांपासून अलग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबापासून १४ दिवस दूर राहणार सलमान खान मीडिया रिपोर्टनुसार, फक्त सलमानलाच नाही तर त्याच्या घरातील इतर सदस्यांनाही १४ दिवस इतरांपासून अलग करण्यात आले आहे. सलमानच्या कर्मचाऱ्यांना इस्पितळात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. असं असलं तरी सलमान किंवा त्याच्या कुटुंबातील कुणीही याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही. कर्मचार्यांच्या उपचारांकडे पूर्ण लक्ष दिलं जातं आहे आपल्या कर्मचार्यांना उत्तोमोत्तम उपचार मिळतील याची काळजी सलमानने घेतली आहे. त्याचबरोबर त्याचं कुटुंब वडील सलीम खान आणि आई सलमा खान यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीची तयारीदेखील करत होते. पण आता या परिस्थिती ही पार्टी रद्दच होईल असं म्हटलं जात आहे. सलमान खान सध्या 'बिग बॉस १४' च्या विकेण्ड का वारच्या चित्रीकरणासाठी घराबाहेर पडतो. पण आता त्याने स्वतःचं अलगीकरण केलं असल्यामुळे येत्या आठवड्यात तो कसं शूट करणार हा प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UGFQhu