Full Width(True/False)

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका वादावर निघाला 'मनसे' तोडगा

मुंबई: ''मालिकेत चुकीचा इतिहास दाखवत भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ही मालिका तातडीने बंद करावी या मागणीसाठी जोतिबा डोंगरावरील पुजारी गेल्या काही दिवसांपासून निदर्शने करत होते. हा वादा आता जवळ-जवळ संपल्यात जमा असून मालिकेच्या वादासंदर्भात मुंबईत काल महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत वादावर तोडगा निघाला असून वाद संपुष्टात आल्याचं म्हटलं जात होतं. गेल्या काही दिवसांपासून मालिकेचा वाद सुरू होता. या संदर्भात समस्त पुजारी, अभ्यासक, मनसे सरचिटणीस , आणि यांच्यात एक महत्त्वपूर्ण अशी बैठक मुंबईत नुकतीच पार पडली. या बैठकीत योग्य ते निर्णय घेऊन वाद संपवण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. कोठारेंनी दिली ग्वाही पुजाऱ्यांचं म्हणणं ऐकूण घेतल्यानंतर निर्माता महेश कोठारे यांनी यानंतर भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची योग्य ती सर्व काळजी घेण्यात येईल अशी ग्वाही दिली. तसंच जोतिबाचा इतिहास चुकीचा किंवा भरकटेला दाखवला जाणार नाही, तसंच त्याच्यात कोणतंही आक्षेपार्ह ऐतिहासिक चित्रण नसेल', असं त्यांनी स्पष्ट केलं. गावकऱ्यांनी दिला शब्द महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शालिनी ठाकरे यांनी या बैठकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानं पुजारी व ग्रामस्थांनी देखील कोठारे यांच्या या मालिकेच्या शूटिंगला गावातून विरोध होणार नाही, शूटिंगमध्ये अडथळे येणार नाहीत, असा शब्द महेश कोठारे यांना दिला. काय होता मालिकेचा वाद? सध्या निर्मित कोठारे प्रॉडक्शनचा ' ' ही मालिका प्रक्षेपित केली जात आहे. या मालिकेच्या प्रक्षेपणपूर्वी पुजाऱ्याकडून माहिती घेतली जाईल. चुकीची माहिती दिली जाणार नाही असा शब्द निर्माते महेश कोठारे यांनी पुजाऱ्यांना दिला होता, पण प्रत्यक्षात सध्या जी मालिका दाखवली जात आहे , त्यामध्ये ते अनेक चुकीच्या घटना असल्याचा आरोप गुरव समाजातील पुजाऱ्यांनी केला होता .


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fd2IOU