मुंबई- सिनेसृष्टीत जितकी चर्चा बॉलिवूड स्टार्सची होते तेवढीच चर्चा त्यांच्या पत्नींचीही होते. अलीकडेच करण जोहरच्या कंपनीने एक रिअॅलिटी सीरिज दाखवली. यात सेलिब्रिटींच्या पत्नींचं आयुष्य कसं असतं ते दाखवण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सवर दाखवण्यात येणाऱ्या या सीरिजचं नाव ‘’ असं आहे. विशेष म्हणजे यात सोहेल खानची पत्नी सीमाही दिसत आहे. आज आपण हिच्याबद्दल सर्व काही जाणून घेऊ.. सोहेल आणि सीमाचं लग्न कसं झालं? सोहेल आणि सीमाची लव्हस्टोरी कोणत्याही बॉलिवूड सिनेमाच्या कथेपेक्षा वेगळी नाही. एका पंजाबी हिंदू कुटुंबाशी संबंध असलेली सीमा मुंबईत फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी येते. तेव्हा एका मित्राकरवी तिची ओळख सोहेलशी होते. दोघांच्या भेटीगाठी होतात. दोघं एकमेकांच्या प्रेमात पजतात आणि १९९८ मध्ये लग्नही करतात. कसं झालं सीमा आणि सोहेलचं लग्न दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांच्या लग्नाच्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. सोहेल आणि सीमा यांनी दोन्ही धर्मांच्या आदर राखत लग्न केलं होतं. आर्य समाज मंदिरात त्यांनी पहिल्यांदा लग्न केलं. त्यानंतर दोघांनी निकाहही केला. सोहेल आणि सीमाच्या कुटुंबीयांनीही हे लग्न आनंदाने स्वीकारले. सोहेल आणि सीमा यांना किती मुलं आहेत? आणि सीमा सचदेव यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव निर्वाण खान तर लहान मुलाचं नाव योहान खान आहे. सोहेल आणि सीमा यांना मुलगी नाही. सीमा एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे सोहेल आणि सीमा यांनी लग्नानंतर करिअरवर लक्ष केंद्रित केलं. सोहेल एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहे तर सीमा सध्या एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे. सीमाचा स्वतःचा एक ब्रँड आहे. याशिवाय ती सुझान खान आणि महिप कपूर यांच्यासोबत एक रिटेल बुटीकही चालवते. या बुटीकचं नाव बांद्रा १९० असं आहे. सोहेल आणि सीमा यांच्यात आला दुरावा? काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की सोहेल आणि सीमा यांच्या नात्यात दुरावा आला आहे. तसंच दोघंही वेगळं होण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या वेगळं होण्याचं कारण अभिनेत्री हुमा कुरेशी असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र नंतर सोहेल आणि हुमा यांनी या सर्व अफवा असल्याचं सांगितलं. हुमा कुरेशीने दिलं या प्रकरणावर स्पष्टीकरण असं म्हटलं जात होतं की सोहेल आणि हुमा यांच्या जवळकीमुळे सीमा तिच्या पालकांच्या घरी गेली होती. तथापि, या अफवा असल्याचं नंतर स्पष्ट झालं. यावर प्रतिक्रिया देताना हुमा म्हणाली की, सोहेल तिच्या मोठ्या भावासारखा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Jhhus2