मुंबई- आणि वरुण धवनचा '' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर ट्रेलर प्रदर्शित होताच तो ट्रेण्डही करू लागला. डेविड धवन यांचा हा ४५ वा सिनेमा असून ते तिसऱ्यांदा मुलगा वरुणसोबत सिनेमा करत आहेत. ट्रेलर पाहून तुम्हाला गोविंदा आणि करिश्मा कपूरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. २५ वर्षांपूर्वी गोविंदा- करिश्मा या सुपरहिट जोडीने 'कुली नं. १' सिनेमात धमाल उडवून दिली होती. आता वरुण आणि सारानेदेखील तेवढीच धमाल करण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमाची कथा आणि अंदाज अगदी २५ वर्ष जुनाच आहे. वरुणने चांगल्या पद्धतीने भूमिका साकारली असली तरी ट्रेलरमध्ये गोविंदाप्रमाणे त्याची जादू चाललेली दिसत नाही. ट्रेलरमध्ये आहे एण्टरटेनमेन्ट, पण आधीसारखी मजा नाही ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर सोशल मीडियावर याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एका हिट सिनेमाच्या रिमेकमधून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आधीच्या सिनेमाबरोबर आताच्या सिनेमाची तुलना होणार हे तर उघडच आहे. ट्रेलर एण्टरटेनमेन्टने परिपूर्ण असला तरी त्यात आधीसारखी मजा दिसत नाही. सारा अली खान खूप सुंदर दिसत आहे, पण तिचे हावभाव पाहिले की ते अॅक्टिंग कमी आणि ओव्हर अॅक्टिंग जास्त दिसते. कथा सारखीच, फक्त चेहरे बदलले ट्रेलर पाहिल्यानंतर दोन गोष्टी स्पष्ट आहेत त्याम्हणजे सिनेमाची कथा जूनीच ठेवण्यात आली आहे. यावेळी फक्त सादरिकरणात बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सिनेमातली पात्रंही सारखीच आहेत, फक्त चेहरे बदलले आहेत. उदाहरणार्थ, यावेळी कादर खान यांच्या जागी परेश रावल आहेत. हरीश कुमार यांच्या जागी जावेद जाफरी 'दिपक'ची भूमिका साकारत आहे. शक्ति कपूरऐवजी राजपाल यादव 'गोवर्धन मामा'ची भूमिका करताना दिसेल. तर टिकू तल्सानिया यांची इन्स्पेक्टर पांडेची भूमिका जॉनी लीवर करत आहेत. एकंदरीत, स्क्रीनवर राजू कुलीचा अंदाज तुम्हाला हसवेल. पण तरीही तो रिमेकच असेल. अगदी तसंच ज्याप्रमाणे वरुण धवनने सलमान खानच्या 'जुडवा' सिनेमाचा रिमेक ‘जुडवा 2’ केला होता. २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार सिनेमा आणि गोविंदा यांची तुलना केली तर गोविंदासमोर वरुण फारच फिका वाटतो. प्रत्येक सीनमध्ये वरुण गोविंदाला कॉपी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणवेल. मूळ सिनेमात कादर खान होते. त्यांच्या टायमिंगची तुलना तर होऊच शकत नाही. तरीही रिमेकच्या ट्रेलरमध्ये परेश रावल ठीक वाटत आहेत. २५ डिसेंबर रोजी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39lpS4C