Full Width(True/False)

सॅमसंग Galaxy M51, Galaxy M31 आणि Galaxy M21 वर मिळताहेत बंपर ऑफर्स

नवी दिल्लीः Samsung Galaxy M सीरीजला अॅमेझॉन इंडियावर आकर्षक सूट आणि ऑफर्स सोबत खरेदी करता येवू शकते. , Galaxy M31, Galaxy M31 Prime Edition, Galaxy M31s आणि Galaxy M21 ला अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये Gifting Happiness Days मध्ये स्वस्तात खरेदी करता येवू शकते. या स्मार्टफोन्सवर ३० टक्क्यांच्या सूटसोबत खरेदी करण्याची संधी आहे. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजच्या या फोन्सला सिटी बँक आयसीआयसीआय बँक, कोटक बँक कार्ड्स आणि रूपे कार्ड्स द्वारे खरेदी केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जात आहे. वाचाः सर्वात आधी लेटेस्ट गॅलेक्सी एम ५१ च्या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस, १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटला २२ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. तर ८ जीबी रॅम प्लस १२८जीबी स्टोरेजच्या फोनला २४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनवर बँक कार्ड्स द्वारे ३ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. जुन्या फोनच्या बदल्यात १२ हजार १०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या फोनमध्ये 7000mAh बॅटरी, एसअमोलेड प्लस डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे. वाचाः गॅलेक्सी एम ३१ च्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला १५ हजार ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनवर नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली आहे. हँडसेटमध्ये 6000mAh बॅटरी आणि एस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. वाचाः गॅलेक्सी एम ३१ प्राईम एडिशनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला १६ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनवर नो कॉस्ट ईएमआय व एक्सचेंज ऑफर दिली आहे. फोनवर ३ महिन्यासाठी अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप ऑफर केली जात आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप, 6000mAh बॅटरी आणि एसअमोलेड डिस्प्ले दिला आहे. वाचाः गॅलेक्सी एम ३१ एसला पहिल्यांदा १५ हजार ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. फोनवर ६ महिन्याची नो कॉस्ट ईएमआय व एक्सचेंज ऑफर दिली आहे. हँडसेटमध्ये ६४ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. वाचाः गॅलेक्सी एम २१ ला आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत अॅमेझॉन सेलमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनला १२ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. फोनमध्ये 6000mAh बॅटरी, ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा यासारखे खास वैशिष्ट्ये दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35Xunir