Full Width(True/False)

५ कॅमेऱ्याचा Honor 10X Lite लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी हुवावेची सब ब्रँड ऑनरने आपला जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत २० हजार २०० रुपये आहे. या फोनमध्ये ४ रियर कॅमेराचा सेटअप दिला आहे. तसेच पंचहोल डिस्प्ले दिला आहे. ३ कलर ऑप्शन सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. या फोनला ग्लोबली लाँच केले आहे. याआधी या फोनला सौदी अरब, रशिया, फ्रान्स आणि जर्मनीत लाँच केले होते. वाचाः मोठी स्क्रीन आणि ३ कलर Honor 10X Lite ला कंपनीने Emerald Green, Icelandic Frost आणि Midnight Black यासारख्या कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले सोबत स्क्रीन रिजॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. Android 10 वर बेस्ड या फोन च्या MagicUI 3.1 मध्ये गूगल प्ले आणि गूगल अॅप्स दिसत नाही. कंपनी या फोनमध्ये Huawei App Gallery देत आहे. वाचाः फास्ट चार्जिंग सोबत 5,000mAh बॅटरी Honor 10X Lite मध्ये octa core HiSilicon Kirin 710A SoC प्रोसेसर दिला आहे. हे खूप पॉवरफुल आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. २२.५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः भारतात कधी होणार लाँच Honor 10X Lite च्या कॅमेऱ्यात ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्यासोबत ४ रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. २-२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. डेप्थ सेन्सर आणि मायक्रो लेन्स सोबत येतात. भारतात लवकरच हा फोन लाँच करण्यात येणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lkaJnt