Full Width(True/False)

Samsung Galaxy A52 5G लवकरच लाँच होणार, अँड्रॉयड ११ आणि स्नॅपड्रॅगन ७५०G प्रोसेसर

नवी दिल्लीः सॅमसंगने या वर्षी आपले अनेक स्मार्टफोन लाँच केलेले आहेत. कंपनीच्या स्मार्टफोन रेंजमध्ये आता आणखी एक नवीन स्मार्टफोन जोडला जाणार आहे. सॅमसंगच्या या अपकमिंग स्मार्टफोनला बेंचमार्किंग वेबसाइटवर गीकबेंचवर स्पॉट करण्यात आले आहे. गीकबेंच लिस्टिंमध्ये आल्यानंतर हा फोन आता लवकरच लाँच करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. वाचाः ६ जीबी रॅम आणि अँड्रॉयड ११ ओएस गीकबेंच लिस्टिंगवर हा स्मार्टफोन मॉडल नंबर SM-A526B से लिस्ट आहे. लिस्टिंगच्या माहितीनुसार, या डिव्हाइसला सिंगल कोर टेस्टमध्ये २९८ आणि मल्टी कोर टेस्टमध्ये १००१ गुण मिळाले आहेत. ६ जीबी रॅमच्या फोन अँड्रॉयड ११ ओएसवर काम करतो. वाचाः स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर मिळू शकतो या लिस्टिंगमध्ये फोनच्या प्रोसेसर संबंधी काही माहिती समोर आली नाही. परंतु, 'lito' कोडनेम ला 1.80Ghz च्या बेस फ्रीक्वेंसी च्या प्रोसेसर सोबत लिस्ट करण्यात आले आहे. ग्राफिक्ससाठी देण्यात आलेल्या अड्रिनो ६१९ वरून अंदाज बांधला जात आहे की, हा फोन स्नॅपड्रॅगन ७५० जीब चिपसेट सोबत येईल. वाचाः ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सप्टेंबर मध्ये उघड झालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्सचा क्वॉड कॅमेरा सेटअप सोबत येईल. फोनमध्ये याशिवाय, अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, एक मायक्रो लेन्स आणि एक डेप्थ असिस्ट लेन्स दिला आहे. तसेच बाकीचे लेन्स किती मेगापिक्सलचे असतील यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. वाचाः गॅलेक्सी A72 5G मध्ये असणार ५ रियर कॅमेरे नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, गॅलेक्सी ए ५२ ५जी चा मेन कॅमेरा सॅमसंग इलेक्ट्रो मॅकेनिक्स सप्लाय करतो. या रिपोर्टमध्ये म्हटले की सॅमसंग गॅलेक्सी ए ७२ ५जी कंपनीचा पेंटा कॅमेरा सेटअपचा पहिला स्मार्टफोन असणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36r8bO2