नवी दिल्लीः भारतात Moto 5G लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी दोन फ़ोन लॉन्च करणार आहे. आणि हे दोन फोन लाँच करणार आहे. परंतु, कंपनीने सध्या Moto G 5G लाँच करण्याची घोषणा केली आहे. वाचाः Motorola भारतात Moto 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी दोन फोन लाँच करणार आहे. Moto G 5G आणि Moto G9 Power हे दोन फोन लाँच करणार असले तरी सध्या एकच फोन लाँच करणार असून येत्या ३० नोव्हेंबर रोजी मोटोरोला कंपनी आपला Moto G 5G लाँच करणार आहे. याला ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून खरेदी करता येवू शकते. Moto G9 Power पुढील महिन्यात लाँच केले जावू शकते. वाचाः Motorola ने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफ़ोन असणार आहे. मोटोरोलाचा Moto G भारतात खूप प्रसिद्ध आहे. याची किंमत नेहमी अन्य फोनच्या तुलनेत कमी राहिलेली आहे. Moto G 5G चे दोन व्हेरियंट लाँच केले जावू शकतात. याला कंपनीने युरोपमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मध्ये लाँच केले असून याची किंमत जवळपास २६ हजार ३०० रुपये ठेवली आहे. भारतात याची किंमत २५ हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. वाचाः Moto G 5G या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकते. Moto G 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरे दिले आहे. या फोनमधील प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये वाइड अँगल लेन्स दिले आहे. याशिवाय, यात २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये २० वॉटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट चार्ज दिले आहे. कनेक्टिविटीसाठी USB Type C पोर्ट दिले आहे. फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33j3y7S