Full Width(True/False)

वोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः (Vi) ने आपल्या युजर्ससाठी नवीन पोस्टपेड प्लान लाँच केला आहे. या पोस्टपेड प्लानची किंमत १३४८ रुपये आहे. कंपनीने या प्लानला REDX Family अंतर्गत लाँच केले आहे. वैयक्तिक पोस्टपेड प्लान्सप्रमाणे यात युजर्संना अनेक प्रसिद्ध ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः १३४८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट वोडाफोन-आयडियाच्या या लेटेस्ट प्लानच्या नियम व अटी संबंधी कोणतीही माहिती दिली आहे. दरम्यान, यात मिळणाऱ्या बेनिफिट्स संबंधी कंपनीने सांगितले आहे. कंपनीने या प्लानमध्ये प्रायमरी कनेक्शनला १५० जीबीची कॅपिंग सोबत अनलिमिटेड डेटा ऑफर करीत आहे. प्लानमध्ये १०० फ्री एसएमएस सोबत कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग बेनिफिट दिला जात आहे. वाचाः सेकंडरी कनेक्शनला ३० जीबी डेटा सेकंडरी कनेक्शनला मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये कंपनी यात ५० जीबी पर्यंत रोलओवर सोबत ३० जीबी डेटा देत आहे. सेकंडरी कनेक्शनला कंपनी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत १०० फ्री एसएमएस देत आहे. वाचाः सेकंडरी कनेक्शनसाठी द्यावे लागतील पैसे या प्लानला सब्सक्राइब करण्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे आहे. कंपनी यात फ्री अॅड ऑन कनेक्शन देत नाही. सेकंडरी कनेक्शनसाठी युजर्सला दर महिन्याला २४९ रुपये द्यावे लागतील. Vi REDX Family पोस्टपेड प्लान अंतर्गत युजर्स जास्तीत जास्त चार सेकंडरी कनेक्शन जोडू शकतात. वाचाः प्लानमध्ये मिळणारे अन्य बेनिफिट्स प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य बेनिफिट्सचा विचार केल्यास यात ५९९८ रुपये किंमतीचा नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन, एक वर्षासाठी अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन, ९९९ रुपये किंमतीचे झी ५ प्रीमियमचे सब्सक्रिप्शन दिले जात आहे. तसेच या प्लानध्ये कंपनी Vi Movies & TV अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. वाचाः इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजचे फ्री अॅक्सेस प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात सब्सक्रायबर्सला वर्षात चार वेळा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय एअरपोर्टवर लाउंजचे फ्री अॅक्सेस मिळणार आहे. ते विना कोणत्याही एक्स्ट्रा चार्जविना हे मिळणार आहे. ओटीटी आणि एअरपोर्ट लाउंज फॅसिलिटी प्लानच्या प्रायमरी कनेक्शन साठी उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Vmx7kO