Full Width(True/False)

५० रुपये एक्स्ट्रा देऊन स्पीड करा दुप्पट, ब्रॉडबँड प्लान्सवर जबरदस्त ऑफर

नवी दिल्लीः ब्रॉडबँड इंटरनेट सर्विस प्रोवाइड करणारी प्रसिद्ध कंपनी एक्साइटेल ने एक जबरदस्त ऑफरची घोषणा केली आहे. ज्यात ३ महिने, ६ महिने किंवा अन्य कोणत्याही अवधीसाठी फायबर प्लान युजर्स केवळ ५० रुपये अतिरिक्त देवून आपली स्पीड डबल करू शकतात. एक्सायटेलचे हे अनलिमिटेड फायबर प्लान ३९९ रुपये, मंथली (100 Mbps), ४४९ रुपये मंथली (200 Mbps) आणि ४९९ रुपये मंथली (300 Mbps) चे आहेत. वाचाः दिल्ली, नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम, गाजियाबाद, रोहतक, जयपूर, लखनऊ, प्रयागराज, हैदराबाद, विजयवाड़ा, गुंटुर, उन्नाव, कानपुर, झांसी, बेंगलुरु आणि विशाखापट्टनम यासारख्या १७ शहरात सुरू असलेल्या एक्साइटेल च्या फायबर प्लान युजर्सला जर केवळ एका महिन्यासाठी अनलिमिटेड इंटरनेट फायबर प्लान घेत असेल तर त्यांना १०० एमबीपीएस साठी ६९९ रुपये, २०० एमबीपीएस स्पीडच्या अनलिमिटेडसाठी ७९९ रुपये आणि ३०० एमबीपीएस अनलिमिटेड डेटासाठी ८९९ रुपये प्रति महिना द्यावा लागेल. तर युजर ३ महिन्याचा एक्साइटेल फायबर प्लान घेत असल्यास त्यांना १०० एमबीपीएस स्पीड साठी ५६५ रुपये, २०० एमबीपीएस अनलिमिटेड डेटा साठी ६३८ रुपये आणि ३०० एमबीपीएस स्पीड साठी ७३२ रुपये मंथली द्यावे लागतील. वाचाः या प्लान्सवर किती लाभ एक्साइटेल फायबर युजर जर ४ महिन्याचा प्लान घेत असेल तर त्यांना 100 Mbps साठी ५०८ रुपये, 200 Mbps साठी ५७२ रुपये आणि 300 Mbps स्पीड साठी ६३६ रुपये द्यावे लागतील. तर ६ महिन्यांच्या प्लानमध्ये युजर्संना 100 Mbps स्पीड साठी ४९० रुपये, 200 Mbps स्पीड साठी ५४५ रुपये आणि 300 एमबीपीएस स्पीड साठी ६०० रुपये द्यावे लागतील. ९ महिन्याच्या प्लानसाठी युजरला 100 Mbps स्पीड साठी ४२४ रुपये, 200 Mbps स्पीड साठी ४७१ रुपये आणि 300 Mbps स्पीड साठी ५३३ रुपये प्रत्येक महिन्याला द्यावे लागतील. वाचाः एक वर्षाचा प्लान घेतल्यास मोठा फायदा एक्साइटेल ब्रॉडबँड युजर जर एकाचवेळी वर्षभराचा फायबर प्लान घेत असेल तर त्यांना 100 Mbps स्पीड साठी दर महिन्याला केवळ ३९९ रुपये, 200 Mbps स्पीडसाठी ४४९ रुपये आणि 300 Mbps स्पीड साठी केवळ ४९९ रुपये दर महिन्याला मोजावे लागतील. म्हणजेच प्रत्येक महिन्याला ५० रुपये जास्त देवून युजर आपली इंटरनेट स्पीड दुप्पट करू शकतात. त्यांची मोठी बचत होऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39AYuzP