नवी दिल्लीः विवो इंडिया लवकरच भारतात आपला आणखी एक स्मार्टफोन (2020) लाँच करू शकते. हा स्मार्टफोन Vivo S1 Pro चा रिप्लेसमेंट आहे. विवोने आज भारतात ५जी सेगमेंटचा जबरदस्त फोन Vivo V20 Pro 5G लाँच केला आहे. याची खूप दिवसांपासून उत्सूकता होती. Vivo Y51 मध्ये कंपनी भारतात Qualcomm Snapdragon 665 SoC प्रोसेसर सोबत लाँच करू शकते. तसेच या फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. या फोनची भारतात रियलमी, ओप्पो, एमआय आणि सॅमसंगसह अन्य कंपन्याच्या मिड रेंज मोबाइल सोबत टक्कर पाहायला मिळेल. वाचाः Vivo Y51 चे खास वैशिष्ट्ये Vivo Y51 फोनमध्ये ६.३८ इंचाचा full-HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. याचा रिझॉल्यूशन 1080x2340 पिक्सल आहे. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. यात अँड्रॉयड १० बेस्ड Funtouch OS 10 ऑपरेटिंग सिस्टम दिला आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 665 SoC प्रोसेसर दिला आहे. वाचाः कॅमेरा आणि बॅटरी Vivo Y51 ला विवो 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट लाँच करणार आहे. कंपनी याला ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम व्हेरियंट सुद्धा लाँच करू शकते. विवो या मिड रेंज फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा म्हणजेच क्वॉड ४ रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट शूटर आहे. विवोच्या या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JGwXC0