मुंबई टाइम्स टीम 'मंटो', 'ठाकरे', 'किक', 'फोटोग्राफ', 'सिरीयस मॅन' या चित्रपटांच्या माध्यमातून तर ''सारख्या सीरिजमधून कसदार अभिनयाची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता म्हणजे . आजवर नवाजुद्दीनने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत त्याच्यातील अभिनयकौशल्य सादर केलं आहे. विशेष म्हणजे अनेक चित्रपटांमध्ये काम करणारा हा अभिनेता केवळ पैशांसाठी चित्रपटांमध्ये काम करतो असा खुलासा त्यानं स्वत: एका मुलाखतीत केला आहे. छोटेखानी ते लक्षवेधी भूमिकांपर्यंत नवाजनं प्रत्येकाला न्याय दिला आहे. 'सरफरोश' चित्रपटातील लहान भूमिका असो किंवा 'सेक्रेड गेम्स'मधील मुख्य भूमिका असो त्याच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. पण, या भूमिका मी केवळ पैसे मिळवण्यासाठीच करतो, असं त्यानं एका मुलाखतीत म्हटलं आहे. 'हलक्याफुलक्या कथानकाचे चित्रपट करायचे नाहीत, असं कधीच माझं मत नव्हतं. कारण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना आम्ही तिथे प्रत्येक प्रकारची नाटकं करायचो. त्यामुळे सगळ्या प्रकारचा अभिनय, भूमिका करणं हे अभिनेत्याचं काम आहे. अभिनेता एक अभिनेताच असतो. मग तो लहान भूमिका करणारा असो किंवा मोठी. माझं अभिनयावर प्रेम आहे. पण, मी काही चित्रपट केवळ पैशांसाठी केले आहेत. ज्या चित्रपटांमध्ये काम केल्यानं मला चांगले पैसे मिळणार होते ते मी केले. पण, त्याचसोबत ज्या चित्रपटांची कथा चांगली असेल ते चित्रपट मी नक्कीच करेन. मग त्यासाठी मला कमी पैसे मिळाले तरी चालतील', असा खुलासा नवाजनं केलाय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36tHnhj