Full Width(True/False)

भारतीय संस्कार विसरलीस का? बिकीनी फोटोमुळे कंगना झाली ट्रोल

मुंबई: बेताल वक्तव्य आणि वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. कंगनानं बिकीनी लूकमधील एक फोटो शेअर केला असून तिच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया आणि लाइक्सचा पाऊस पडला आहे. असं असलं तरी अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे. कंगनानं मॅक्सिकोमधील बेटावर काढलेला बिकीनीतील फोटो शेअर केला आहे. ' मित्रांनो सुप्रभात. मला आवडेल्या आणि सुंदर असलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण हे मॅक्सिकोत आहे. मॅक्सिकोतील एका बेटावर निवांतक्षणी काढलेला हा फोटो', असं कंगनानं तिच्या फोटोच्य कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. कंगनाचा हा बिकीनी लूक अनेक जणांना आवडला नाही. काहींनी तिला भारतीय संस्कृती आठवण करून दिली तर काहींनी तिला संस्काराबद्दल प्रश्न विचारले. हिच का हिंदू संस्कृती? तुझे संस्कार विसरलीस का?असे टोले तिला नेटकऱ्यांनी लगावले आहेत. जसे तुमचे मूलभूत हक्क तसे कंगनाचेही 'मूलभूत हक्क हे अमर्यादित नसतात, त्यावर तर्कसंगत मर्यादा आणल्या जाऊ शकतात. परंतु, जसे तुमचे मूलभूत हक्क आहेत, तसेच तुम्ही ज्यांच्याविरोधात याचिका केली आहे त्यांचेही आहेत. त्यामुळे तुमच्या रिट याचिकेच्या आधारावर आम्ही त्यांच्या मूलभूत हक्कांना मर्यादा कशा घालू शकतो, हे तुम्ही कायदेशीर मुद्द्यांद्वारे सांगायला हवे', असे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या संदर्भात जनहित याचिका करणाऱ्या वकिलाच्या निदर्शनास आणले. 'कंगना वारंवार समाजात दुही व द्वेषभावना निर्माण करणारे, सामाजिक सौहार्दता व बंधुभाव बिघडण्यास चिथावणी देणारे, विशिष्ट धर्माची प्रतिमा मलीन करणारे ट्विट करत आहे. याविषयी तक्रार देऊनही ट्विटर इन्कॉर्पोरेशन कंपनीनं त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचे स्थगित किंवा बंद करण्याचे निर्देश द्यावेत', अशा विनंतीची याचिका यांनी केली आहे. 'कंगनाच्या त्या कथित ट्विट्सने तुमचे वैयक्तिक नुकसान झालं आहे का? तसं नसंल तर हा विषय रिट याचिकेचा होऊ शकतो का? हा जनहित याचिकेचा विषय नाही का?', असे प्रश्न मागील सुनावणीत उपस्थित करून न्या. संभाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने देशमुख यांना म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी सोमवारच्या सुनावणीत कायदेशीर मुद्दे मांडले. रिट याचिकेच्या माध्यमातून इतरांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा आणता येऊ शकतात का, असा प्रश्न उपस्थित करून आणखी कायदेशीर अभ्यास करून ७ जानेवारीला म्हणणे मांडा, असे सांगून खंडपीठानं सुनावणी तहकूब केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2KK2bZD