मुंबई टाइम्स टीम गायक याने आगामी ‘’ चित्रपटासाठी ‘’ हे गाणं गायलं आहे. तो म्हणतो की तो मोठ्या पडद्यावर हे रोमँटिक अ‍ॅक्शन फिल्ममधलं गाणं पाहण्यास उत्सुक आहे. त्याबरोबरच मिका पुढे म्हणाला की, 'मी खरोखरच उत्साहित आहे. कारण माझ्यासह बरेच लोक कित्येक महिने घरी बसून कंटाळले होते. गेल्या आठ महिन्यांपासून मला काहीच काम मिळालेलं नाही आणि मला खात्री आहे की माझ्यासारखी बरीच लोकं आहेत. लोकांनी बऱ्याच दिवसांत थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिलेला नाही. म्हणून हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाण्याची योग्य वेळ आली आहे.' चित्रपटातील त्याच्या गाण्याबद्दल मिका म्हणाला, 'मी ‘सयोनी’ चित्रपटात 'एक पप्पी' हे गाणं गायलं आहे. नवीन संगीतकार अनंत आणि अमन यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे गाणं गाण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता, तेव्हा मला सुरुवातीला हे फारसं आवडत नव्हतं. पण, जेव्हा मी हे गाणं तीन-चार वेळा गुणगुणलो तेव्हा मला खूप मजेदार वाटलं. यात काही द्वयर्थी शब्दही आहेत. मला वाटतं की एकंदरीत हे गाणं चांगल्या प्रकारे चित्रीत करण्यात आलं आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3navumw