मुंबई: अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका म्हणजे ''. मालिकेतील कलाकारांचा अभिनय देखील चर्चेता विषय ठरत आहे. मालिकेत रोज नवीन काही रंजक असे ट्विस्ट पाहायला मिळत असल्यानं मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेच एक वैशिष्ट्य म्हणजे मालिकेतील बहुतांश कलाकार हे प्रेक्षकांसाठी नवीन आहेत. अभिनयाची आवड असलेल्या या कलाकारांना मिळालेली संधी सोन्याहून कमी नसल्याचं त्यांनी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सांगितलं. देवमाणूस मालिकेतील कलाकारांनी चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. या मंचावर त्यांनी त्यांचा संघर्ष सांगितला. नाम्या, बज्या, मंजू, टोन्या ,डिंपल ,मंजू, आजी, बाबू, मंगल आणि डॉक्टर या सर्वांनीच त्यांच्या इथवरच्या प्रवासाबद्दल सांगितलं. मालिकेत 'बज्या' म्हणजेच अभिनेता यानं त्याच्या करिअरमधला संघर्ष सांगितला. अभिनयाच्या क्षेत्रात अस्थिरता असल्यानं आर्थिक गरजांसाठी तो कल्याणमध्ये रिक्षा चालवत असल्याचं त्यानं सांगितलं. 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर आल्यानंतर त्यानं एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. काय म्हटलंय पोस्टमध्ये?शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलना पासून , आपल्या चाळीतल्या गणपती पासून , पथनाट्य पासून, आज......आज सगळ्यांची लाडकी वाहिनी झी मराठीवरील ' देवमाणूस ' मालिके पर्यंत आणि आता नट म्हणून काम करताना आयुष्यात एकदा तरी आपल्याला महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वोत्तम व्यासपीठ ठरलेलं 'चला हवा येऊ द्या' येथे जायला मिळावं हे स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र काम करणाऱ्या, महाराष्ट्रातल्या लाखो नटानं पैकी मी एक. आज मी त्या प्रत्येक माणसाचे आभार मानतो ज्या माणसाच्या कुठल्या ना कुठल्या मदतीमुळे , सपोर्टमुळे , विश्वासामुळे आज इथपर्यंत पोहोचलो. माझ्यासारख्या सर्व सामान्य घरातून नट होऊ इच्छिणाऱ्या सर्व मित्रांना इतकच सांगेन.तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुमच्या अडचणी तुमच्या अडचणींना सांगा तुमची स्वप्न.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nQtlwz