नवी दिल्लीः OnePlus यूजर्सला कंपनीच्या लेटेस्ट Wireless इयरबड्समध्ये अडचण येत आहे. अँड्रॉयड युजर्सच्या रिपोर्टनुसार अनेक वनप्लस बड्स युजर्सने वनप्लस फोरमवर इयरबड्समध्ये येत असलेली समस्येसंबंधी रिपोर्ट केले आहे. युजर्संच्या माहितीनुसार, वनप्लस बड्सचे लेफ्ट साइडचे बड अचानक काम करणे बंद करीत आहे. ही समस्या रिपेयरिंग, रिसेटिंग किंवा डिव्हाइस डिसकनेक्ट केल्यानंतर व्यवस्थित होत आहे. वाचाः रिप्लेसमेंट युनिट्समध्ये येतेय ही अडचण काही युजर्सला कंपनीने रिप्लेसमेंट युनिट्स उपलब्ध केले आहे. परंतु, युजर्सच्या म्हणण्यानुसार त्यांना रिप्लेसमेंट युनिट्स मध्ये सुद्धा ही अडचण येत आहे. वनप्लस बड्स मध्ये येत असलेली ही अडचण एक सॉफ्टवेयर बग आहे. वनप्लस फोरमवर बड्सची समस्या संबंधी सर्वात आधी सप्टेंबर मध्ये रिपोर्ट करण्यात आले होते. तसेच नोव्हेंबर संपल्यानंतर सुद्धा युजर्स या समस्येचा सामना करीत आहे. युजर्स आता फोरमवर रिपोर्ट करीत आहेत. वाचाः फर्मवेयर या हार्डवेयर अडचण ३० सप्टेंबर रोजी एका युजरने म्हटले होते की, हे एक फर्मवेयर इश्यू आहे. युजरने म्हटले की, या डिव्हाईसला रिकनेक्ट केल्यानंतर ठीक केले जावू शकते. तसेच आणखी एका युजरने म्हटले की, लेफ्ट इयरबडचे टच आणि सेंसर ऑडियो आल्यानंतर व्यवस्थित काम करते. वाचाः चॅट असिस्टेंटने मानले हार्डवेयरची समस्या अँड्रॉयडच्या एका युजरने सांगितले की, फर्मवेयर इस्यू नाही आहे. फोरमवर सध्या एका पोस्टनुसार, युजर सोबत वनप्लस सपोर्ट असिस्टेंटच्या चॅट वर चर्चा झाली होती. परंतु, युजरच्या दुसऱ्या रिप्लेसमेंट युनिट मध्ये समस्या येत असल्यास असिस्टेंटने म्हटले की ही एक हार्डवेयर समस्या आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36p7lmh