चैन्नई- दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे चियान याचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. यानंतर एकच गोंधळ उडाला. सोमवारी एका अज्ञात व्यक्तीने त्याला फोन करून घरात बॉम्ब असल्याची माहिती दिली. यानंतर शोध कुत्रे आणि बॉम्बविरोधी पथकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अभिनेत्याच्या घराची झडती घेतली. विक्रम चेन्नईच्या बसंत नगर येथे राहतो. घराची संपूर्ण तपासणी केल्यानंतर पोलिसांनी तो दिशाभूल करणारा कॉल असल्याचं स्पष्ट केलं. तसंच अधिकाऱ्यांना कॉल ट्रेस करण्याचेही आदेश दिले. विक्रमच्या आधी विजय, अजित, सूर्या, विजयकांत आणि रजनीकांत यांनाही असेच कॉल करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी पोलीस नियंत्रण कक्षात एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला ज्याने विक्रमच्या घरात बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली. तिरुवनमियूर ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड (BDDS) आणि एक स्निफर कुत्र्यासह वुक्रमच्या घराची झडती घेतली. विल्लुपुरममधील एका व्यक्तीने धमकी देऊन हा फोन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यापूर्वी विल्लुपुरमच्या मराक्कनममधील एका मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीने तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी आणि इतर अनेक कलाकारांना बॉम्ब असल्याची धमकी दिली होती. नंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी माफीही मागितली होती. आता या प्रकरणातही तीच व्यक्ती असू शकते असा पोलिसांचा संशय आहे. विक्रमच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर अखेर दिग्दर्शक राजेश एम सेल्वा यांच्या कदरम कोंडन सिनेमात दिसला होता. तो सध्या अजय ज्ञानमुथु दिग्दर्शित आगामी कोब्रा सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची वाट पाहत आहे. करोना साथीमुळे या सिनेमाचं रशियातलं चित्रीकरण थांबवावं लागलं होतं. कोब्रा सिनेमात माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण, श्रीनिधी शेट्टी, केएस रवी कुमार, बाबू अँथनी, रोशन मॅथ्यू आणि मिरनलिनी रवी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33z4wwW