Full Width(True/False)

सुशांतच्या कुत्र्याचा नवा व्हिडिओ आला समोर, भाचीने घेतलं दत्तक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता याच्या निधनाने त्याचा पाळीव कुत्रा फजचं काय होणार याचीही त्याच्या चाहत्यांना चिंता होती. दरम्यानच्या काळात फजचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुशांतच्या जाण्याने फजचा उतरलेला चेहरा पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. सुशांतची भाची मल्लिका सिंहने फजला दत्तक घेतल्याची बातमी आता समोर आली आहे. यांचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये फजला थंडी वाजू नये म्हणून डॉग कोट घातलेला दिसत आहे. तर दुसरीकडे झूमने हा व्हिडिओ शेअर करताना सुशांतच्या कुत्रा फज आता त्याच्या भाचीने मल्लिका सिंहने दत्तक घेतला आहे असं कॅप्शन लिहिलं. सुशांतची भाची अनेकदा तिच्या मामाशी संबंधित काही आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी मल्लिकाने सुशांतचा कुत्रा फजचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात कुत्रा दुसरीकडे पाहत होता. हा व्हिडिओ शेअर करताना मल्लिकाने लिहिले की, 'जेव्हा जेव्हा दरवाजा उघडतो किंवा कोणी दारातून आत येतं तेव्हा फज अपेक्षेने त्या दिशेने पाहत असतो.' सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर सुशांतच्या कुटुंबियांनी फजला पटण्यात नेले होते. काही दिवस तो सुशांतच्या वडिलांसोबत राहत होता. आता सध्या फज सुशांतची भाची मल्लिकासोबत राहत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qh8Rh9