Full Width(True/False)

रेडमीच्या 'या' फोनची लाँचिंग ८ जानेवारीला, लाँचआधीच फोटो-फीचर्स लीक

नवी दिल्लीः स्मार्टफोन ८ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. लाँच आधीच जर्मनीची वेबसाइटवर हँडसेटची लिस्टिंग पाहिली गेली आहे. लिस्टिंगवरून या फोनचे खास वैशिष्ट्ये आणि फोटो लीक झाली आहे. आता लिस्टिंगला अॅक्सेस दिला नाही. कारण, याला साइटवरून हटवले आहे. वाचाः रेडमी नोट 9T 5G ची अॅमेझॉनवर दिसलेल्या फोटोला एका टिप्स्टरने अॅमेझॉन लिस्टिंगला डिलिट करण्याआधी डाउनलोड केलेले आहे. रेडमी नोट ९ टी ५ जी ला ब्लॅक आणि वॉयलट कलर्समध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. रेडमी नोट 9T 5G च्या फोटोवरून हे उघड झाले आहे की, फोनमध्ये पंचहोल डिस्प्ले आणि बाजुला फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाणार आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर एक राउंड शेप कॅमेरा मॉड्यूल दिला जाणार आहे. हँडसेटच्या रियर वर एक एलईडी फ्लॅश दिला जाणार आहे. वाचाः रेडमी नोट 9T 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये रेडमी नोट 9T 5G च्या या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन 1080 x 2340 पिक्सल सपोर्ट करते. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. हँडसेटमध्ये ड्यूल स्पीकर्स दिले आहेत. वाचाः या फोनमध्ये डायमेंसिटी ८०० यू चिपसेट दिला आहे. फोनमध्ये LPPRDR4x रॅम व UFS 2.2 स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे. फोनला १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5000mAh बॅटरी दिली आहे. यात एनएफसी कनेक्टिविटी दिली आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये रियरवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. या फोनच्या किंमती संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/395LgZQ