Full Width(True/False)

दीपिका पादुकोणसाठी सोशल मीडियावर होत आहेत या सर्व गोष्टी

मुंबई- बॉलिवूडची 'मस्तानी' आज मंगळवार ५ जानेवारी रोजी ३५ वर्षांची झाली. २०२० हे वर्ष अनेकांसाठी चिंतेचं वर्ष होतं. त्यातही दीपिकाच्या आयुष्यात या वर्षाने अनेक अडचणींमध्ये भर पाडली. बहूचर्चित ड्रग्ज प्रकरणात तिचं नाव आलं. असं असलं तरी नवीन वर्षाचं स्वागत तिने नवीन स्वप्ने, नवीन उत्साहाने करण्याचा निर्णय घेतला आहे. २००७ मध्ये शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. १३ वर्षांच्या फिल्मी करिअरनंतर दीपिकाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती फक्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच नाही तर एक माणूस म्हणूनही तिने आपली ओळख समाजात निर्माण केली आहे. नैराश्याबद्दल बोलणं असो की महिलांच्या सन्मानासाठीचं दीपिका अनेक सामाजिक मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसते. #HappyBirthdayDeepikaPadukone सकाळपासूनच सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकजण सोशल मीडियाची मदत घेत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3b7fZbF