Full Width(True/False)

शुभ मंगल सावधान! अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सर याच्यासोबत मानसी विवाहबंधनात अडकली आहे. करोनाचं संकट टळलं नसल्यानं योग्य ती काळजी घेत काही मोजक्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत मानसीचा विवाहसोहळा पार पडला. अभिनत्री दिपाली सय्यद, रेशम टिपणीस यांच्यासह काही कलाकारांनीही मानसीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. कोण आहे मानसीचा पती? काही महिन्यांपूर्वी मानसीनं आंतरराष्ट्रीय प्रदीप खरेरा याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मानसीचा पती हा बॉक्सर तर आहेच, शिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. त्यानं अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढंच नाही तर मध्ये मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स २०१८ चा तो विजेता आहे. मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39M0cwB