Full Width(True/False)

शाहरुखने पहाटे उठून संपूर्ण सामना पाहिला, म्हणाला 'आता शांत झोपेन'

मुंबई- भारतीय संघाने मंगळवारी ब्रिस्बेनच्या गाबा येथे चौथा कसोटी सामना ३ गडी राखून जिंकत इतिहास रचला. यानंतर सोशल मीडियावर खेळाडूंवर अभिनंदनाचा पाऊस पडत आहे. यात बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर टीम इंडियाला या ऐतिहासिक विजयावर शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड सिनेनिर्माता करण जोहरने त्याच्या धर्मा प्रॉडक्शनचा व्हिडिओ रीट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये कभी खुशी कभी गम सिनेमातील एक क्लिप शेअर करण्यात आली आहे. या क्लिपमध्ये अभिनेत्री काजोलच्या हातात भारताचा झेंडा असून ती आनंदाने 'जिंकलो..' असं बोलताना दिसत आहे. या क्लिपला कॅप्शन देताना 'सध्या प्रत्येक भारतीयाचा मूड काहीसा असाच आहे,' असं लिहिण्यात आलं आहे. त्याचवेळी रणवीर सिंगने टीमचा एक फोटो शेअर करत लिहिले की, 'ऐतिहासिक विजय.. तुमचे प्रयत्न प्रशंसनीय होते.. आम्हाला तुमचा अभीमान आहे...' यावर रणवीरने तिरंग्याचे इमोजीही शेअर केले आहेत. याने ट्वीट करत लिहिलं की, 'आपल्या टीमने किती मोठा विजय मिळवला आहे. प्रत्येक बॉल पाहण्यासाठी मी रात्रभर जागलो. आता मी शांतपणे झोपेन आणि हा विजय किती खास होता याचा अनुभव घेईन. सर्व मुलांना प्रेम.. त्यांच्या लढाऊ शक्तीचं मी कौतुक करतो. चक दे इंडिया!' रितेश देशमुखने लिहिले की, 'इंडिया जिंदाबाद.. आम्हाला तुमचा अभिमान आहे. हा एक मोठा विजय आहे.. अभिनंदन कर्णधार.' सुनील शेट्टीनेही टीम इंडियाचा फोटो शेअर करत लिहिलं की, 'या ऐतिहासिक विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन. क्रिकेटचं भविष्य चांगलं आहे.' अक्षय कुमारने टीम इंडियाचा फोटो शेअर करत ट्वीट केलं. 'जबरदस्त परफॉर्मन्ससाठी टीम इंडियाचं अभिनंदन. कठीण प्रसंगावर मात करत तुम्ही इतिहास रचला. म्हणूनच तुम्ही चॅम्पियन आहात.' आजच्या शेवटच्या दिवसात ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचं लक्ष्य दिलं होतं. टीम इंडियाने ९७ षटात ७ गडी गावत हा सामना जिंकला. याचसोबत बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीही आपल्या नावावर केली. २०१८ मध्येही भारतानेच ही मालिका जिंकली होती. टीम इंडियासाठी हा विजय फार महत्त्वाचा होता कारण बरेच स्टार खेळाडू दुखापतीमुळे मैदाना बाहेर होते तर काही दुखापत असूनही खेळत होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qzr4Xz