Full Width(True/False)

'तांडव' चं नव्हे तर, 'या' सीरिजही सापडल्या होत्या वादाच्या भोवऱ्यात

मुंबई टाइम्स टीम सध्या चित्रपटांप्रमाणे सीरिजमधील काही दृश्य वादाचा विषय ठरत आहेत. एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करण्यापासून ते लोकांच्या भावना भडकवण्यापर्यंत सीरिजमधील दृश्य अतिरंजित केली जातात. सध्या '' या सीरिजमधील धार्मिक भावना दुखावणाऱ्या दृश्यावरुन वादंग उठला आहे. जास्तीतजास्त प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वादग्रस्त आशय वापरला जात असला तरी प्रेक्षकांची नाराजी ओढावून घेतली जात आहे. तसंच प्रेक्षकांच्या हातात असलेल्या सोशल मीडियामुळे व्यक्त होण्यासाठी माध्यम उपलब्ध झालं आहे. याप्रमाणे गेल्या वर्षभरात अनेक वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या सीझननं लोकप्रियता मिळवली. त्याचबरोबर त्या सीझनमध्ये काही नेत्यांवर भाष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. नंतर ' २'नं देखील प्रेक्षकांचा रोष ओढावून घेतला होता. त्या दृश्याबद्दल सोशल मीडियावरही आवाज उठवण्यात आला होता. 'लैला' या सीरिजच्या ट्रेलवरुन वाद झाले होते. तेव्हा सीरिजवर बंदी आणण्याची मागणी काही लोकांनी केली होती. निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित 'दिल्ली क्राइम' सीरिजविरुद्ध एका व्यक्तीनं आक्षेप घेतला होता. 'अभय २' ही सीरिजही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यात स्वातंत्र्य सैनिकाचा फोटो चुकीच्या उद्देशानं वापरण्यात आला होता. गेल्या वर्षी आलेली '' ही सीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली. पण, त्यात वकिलांची प्रतिमा मलीन करणारी दृश्य दाखवण्यात आली होती. या सीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध पोलिस तक्रार नोंदवण्यात आली होती. 'पाताल लोक' सीरिजवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला असला तरी त्यात एका नेत्याचा फोटो वापरण्यात आला होता. कालांतरानं सीरिजमधील ते वादग्रस्त दृश्य काढून टाकण्यात आलं. एकता कपूरची निर्मिती असलेल्या अनेक सीरिज वादाचं निमित्त ठरल्या. त्यापैकी एक म्हणजे 'ट्रीपल एक्स २'. यामध्ये अति अश्लील दृश्य दाखवण्यात आली होती. शिवाय, भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्याची प्रतिमा मलीन करणारं दृश्य होतं. नंतर ती सगळी दृश्यं काढून टाकण्यात आली. ''मधील काही दृश्यांविरुद्ध आक्षेप घेण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी आलेली '' ही सीरिज चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली. यातील एका दृश्याविरोधात पोलिस तक्रार करण्यात आली होती. ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म्सची घोडदौड सुरु असली तरी काही सीरिज वादग्रस्त आशयामुळे प्रेक्षकांची नाराजी ओढावून घेत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3paMXMM