अभिनेता सुशांतसिंहराजपूत याच्या मृत्यूला आता सात महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. पण अद्यापही त्याच्या मृत्यूमागचं गुढ मुंबई पोलीस आणि सीबीआयला सापडलेलं नाही. त्याच्या अकाली निधनानंतर सुशांतचे चाहते आज त्याच्या वाढदिवसालाआदरांजली वाहत आहेत. अजूनही चाहत्यांच्या मनात बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळण्याची ते वाट पाहत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली होती. यात त्यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले होते. याआधी त्यांनी २५ फेब्रुवारी २०२० रोजी आपल्या मुलाचा जीव धोका असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी रिया सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे पैसे हडपण्याचा प्रयत्न करत आहे. हे कळल्यानंतरही मुंबई पोलिसांनी कोणतीच कारवाई का केली नाही.
अभिनेता सुशांतसिंहराजपूत याच्या मृत्यूला आता सात महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. पण अद्यापही त्याच्या मृत्यूमागचं गुढ मुंबई पोलीस आणि सीबीआयला सापडलेलं नाही. त्याच्या अकाली निधनानंतर सुशांतचे चाहते आज त्याच्या वाढदिवसालाआदरांजली वाहत आहेत. अजूनही चाहत्यांच्या मनात बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळण्याची ते वाट पाहत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली होती. यात त्यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले होते. याआधी त्यांनी २५ फेब्रुवारी २०२० रोजी आपल्या मुलाचा जीव धोका असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी रिया सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे पैसे हडपण्याचा प्रयत्न करत आहे. हे कळल्यानंतरही मुंबई पोलिसांनी कोणतीच कारवाई का केली नाही.
चौकशीशिवाय आत्महत्या केल्याचं का सांगितलं
१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृत्यू झाला. याची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावरून काही पुरावे हाती घेतले आणि सुशांतच्या घराबाहेर त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचं सांगितलं. कोणताही कारवाई किंवा चौकशी करण्याआधीच पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केल्याचं घोषित केलं होतं.
५० हून जास्त सिम कार्ड का बदलले
पोलिसांनी सुशांतशी संबंधित लोकांची चौकशी केली असता सुशांतने या काळात जवळपास ५० सिमकार्ड बदलल्याची माहिती मिळाली. सुशांतला अंडरवर्ल्डकडून धमक्या येत असल्याचं वृत्त आहे. तो वारंवार त्याचा नंबर बदलायचा. पोलिसांनी यावर कारवाई का केली नाही? सुशांतच्या फ्लॅटची दुसरी किल्ली पोलिसांनी का शोधली नाही? तसंच सुरुवातीच्या तपासणीत पोलिसांनी अपार्टमेंटचा सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला असता तर कदाचित त्याचवेळी बर्याच गोष्टी कळाल्या असत्या.
सिद्धार्थ पिठाणी आणि रिया चक्रवर्ती यांचे संबंध काय
सिद्धार्थ पिठानी सुशांतचा खूप जवळचा मित्र होता. तो त्याच्यासोबत सुशांतच्या घरीच राहत होता. पण, जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला आणि संपूर्ण प्रकरण उलघडण्यास सुरुवात झाली, तेव्हा सिद्धार्थने आपली बाजू बदलली आणि त्याने रिया चक्रवर्तीची बाजू घेतली. सुशांतच्या शेवटच्या दिवसांमध्ये, सिद्धार्थच त्याच्या जवळ होता. पोलीस आणि सीबीआयनेही सिद्धार्थची चौकशी केली. या कारवाईत सिद्धार्थ सतत विधान बदलत राहिला. तो असं का करत होता हा प्रश्नही अजून अनुत्तरित आहे.
सीबीआय तपास आणि रियाची भूमिका
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासादरम्यान एक दिवस रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत तिचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर तिने सीबीआय चौकशीला विरोध दर्शवला होता. सीबीआय चौकशीची मागणी करणार्या लोकांच्या मागणीला तिने बेकायदेशीर आणि न्यायाच्या विरोधात असल्याचं सांगितलं. रियानेही अनेकदा तिच्या भूमिका वारंवार बदलल्या.
महाराष्ट्र सरकारचा सीबीआय चौकशीला विरोध का होता
सुशांत प्रकरणात सुरुवातीपासूनच मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला नाही असा आरोप होता. मात्र, जेव्हा चौकशी सीबीआयकडे सोपवण्यास सांगण्यात आलं तेव्हा पोलिसांनी संमती दिली नाही. सीबीआय चौकशीवर फक्त मुंबई पोलिसांनीच नाही, तर महाराष्ट्र सरकारनेही प्रश्न उपस्थित केले होते. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुंबई पोलिसांनी जर मुंबई हल्ल्यासारख्या घटनेवर योग्य तपास केला असेल तर या खटल्याप्रकरणीही त्यांच्यावर विश्वास ठेवावा. जर तसे झालं नाही तर ते मुंबई पोलिसांच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह आहे.
कोण्या राजकीय नेत्याचाही यात हात आहे
सुरुवातीला पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून घोषित केलं. पण नंतर जेव्हा तपास लागला तेव्हा या प्रकरणात हाय प्रोफाइल लोक गुंतले असल्याचं दिसलं. यामध्ये डझनभर लोकांची चौकशी करण्यात आली आणि वेळोवेळी या प्रकरणात महाराष्ट्राचा एक तरुण नेताही सामील असल्याच्या बातम्या समोर येत राहिल्या. असं असलं तरी महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय दोघांनीही याबद्दल ठोस असं काहीच सांगितलं नाही.
सुशांत आणि त्याच्या कुटुंबाला लक्ष्य केलं गेलं
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा खटला सुरू असून कारवाई सुरूच आहे. पण, अचानक सुशांतच्या घरातील लोकांनी निवेदन जारी केलं. या निवेदनात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की कुटुंबाच नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी एक पत्र शेअर करत काही लोक त्यांना धडा शिकवण्याची धमकी देत असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर सर्वांच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केले गेले होते.
सुशांतचं दिशा सॅलियन कनेक्शन
सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्याची पूर्व मॅनेजर असलेल्या दिशा सॅलियनचाही मृत्यू झाला. बर्याच लोकांनी या दोन घटनांना एकत्र जोडलं. दिशाच्या निधनानंतर सुशांत पूर्णपणे तुटला होता. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतचा मृत्यू झाला. मात्र, पोलीस आणि सीबीआय या दोन्ही घटनांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत राहिले परंतु यात कोणतंही कनेक्शन मिळालं नाही. पण सुशांतच्या चाहत्यांना देखील या प्रकरणाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
सुशांतच्या डिप्रेशनची गोष्ट फक्त रियालाच कशी माहीत होती
पोलीस तपासणी दरम्यान रियाने सांगितलं होतं की सुशांत नैराश्यात होता. मात्र, पोलिसांनी सुशांतच्या घरात काम करणाऱ्या कर्मचार्यांना आणि सुशांतच्या कुटुंबियांना विचारले असता, त्यांना याबद्दल काहीच कल्पना नसल्याचं सांगितलं होतं. सुशांतच्या बहिणीने पोलिसांना सांगितलं की सुशांत काही काळ डिप्रेशनची औषधं घेत होता. पण त्याने दिड आठवड्यापासून औषधं घेणं बंद केलं होतं. सुशांतच्या डॉक्टरांनीही याची पुष्टी केली. या व्यतिरिक्त आणखीही अनेक प्रश्न सुशांतच्या चाहत्यांच्या मनात आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/360jz47