मुंबई- बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षभरात बड्या बड्या स्टार्सनी नवीन घरं विकत घेतली आहेत. आलिया भट्टनंतर या यादीत आता जान्हवी कपूरचं नावही जोडलं गेलं आहे. गेल्या महिन्यात मुंबईत जान्हवीने कोट्यवधी रुपयांचे नवीन घर विकत घेतल्याची बातमी समोर आली आहे. असं म्हटलं जातं की जान्हवीने हे घर जुहू येथील एका इमारतीत १४, १५ आणि १६ व्या मजल्यावर आहे. जान्हवीने गेल्या वर्षी ७ डिसेंबरला हा करार केला होता. स्क्वेअर फीट इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जान्हवीच्या या नवीन घराची किंमत जवळपास ३९ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या घरासाठी जान्हवीने ७८ लाख रुपयांचं मुद्रांक शुल्कही भरलं आहे. दरम्यान, करोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाउननंतर सरकारने मालमत्ता खरेदीत मुद्रांक शुल्कात मोठी कपात केली होती. याचा फायदा उचलत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी मुंबईत प्रॉपर्टी विकत घेतली. आलिया भट्ट आणि हृतिक रोशन यांनीही जान्हवीपूर्वी कोट्यवधी रुपयांचं नवीन घर विकत घेतलं आहे. जान्हवी कपूरने आतापर्यंत फक्त 'धडक' आणि 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या दोन सिनेमांमध्ये काम केलं आहे. दरम्यान यावर्षी तिचे राजकुमार राव सोबतचा 'रुही अफझाना' आणि कार्तिक आर्यनसोबतचा 'दोस्ताना २' हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय करण जोहरच्या मल्टीस्टारर फिल्म 'तख्त' सिनेमातही दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38cW5tV