Full Width(True/False)

भारतात ११ जानेवारीला OnePlus Band लाँच होणार?, किंमत-फीचर्स लीक

नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात ही माहिती समोर आली होती की, देशात २०२१ च्या पहिल्या तिमाहीत लाँच करण्यात येणार आहे. आता कंपनीने वनप्लस बँड संबंधित माहिती शेयर करणे सुरू केले आहे. याशिवाय प्रसिद्ध टिप्स्टर ने सुद्धा केवळ बँडची लाँच डेट नव्हे तर याच्या किंमतीचा सुद्धा खुलासा केला आहे. वाचाः टिप्स्टर इशान अग्रवालने वनप्लस बँड संबंधी लेटेस्ट माहिती शेयर केली आहे. टिप्स्टरच्या माहितीनुसार, वनप्लसचा पहिला फिटनेस ट्रॅकर देशात १ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. याची किंमत जवळपास २४९९ रुपये असणार आहे. लीक माहितीनुसार, वनप्लस बँडमध्ये १.१ इंचाचा अमोलेड डिस्प्ले असणार आहे. यात एक हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन लेवल मॉनिटरींग साठी एक SpO2 आणि स्लीप मॉनिटरिंग सपोर्ट मिळणार आहे. वाचाः याशिवाय, वनप्लस बँडमध्ये १३ स्पोर्ट्स मोड मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वनप्लसचा हा बँड वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस साठी IP68 सर्टिफिकेशन सोबत येणार आहे. फिटनेस ट्रॅकरची बॅटरीच्या सिंगल चार्जमध्ये १४ दिवसांची बॅकअप मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. वाचाः ओप्पो बँड सुद्धा याच फीचर्स सोबत येतो. प्रोडक्ट संबंधी गेल्या आठवड्यात लीक पोस्टरमधून ही माहिती समोर आली होती. भारतात वनप्लस बँडला आधीच बाजारात असलेल्या Mi Smart Band 5 आणि Mi Smart Band 4 शी सामना करावा लागणार आहे. वनप्लस बँडमध्ये येणाऱ्या SpO2 सेंसरचे खास वैशिष्ट्ये आहे. शाओमीच्या प्रसिद्ध फिटनेस ट्रॅकरमध्ये हे फीचर मिळत नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oeCZt2