नवी दिल्लीः देशातील युजर्संची माहिती सुरक्षित राहावी यासाठी केंद्र सरकारने दोनशेहून अधिक चायनिज अॅप्सवर बंदी घातली आहे. परंतु, वारंवार अशा प्रकारची माहितीची चोरी करून ती साइटवर विकली जात असल्याचे समोर येत आहे. आता पुन्हा एकदा भारतीय युजर्सच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा चोरी झाला असून याची माहिती डार्क वेबवर विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाचाः सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील जवळपास १० कोटी भारतीयांचा डेटा चोरीला गेला असून त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माहितीचा लिलाव करण्यात येत आहे. त्याची माहिती विकली जात आहे. डार्क वेबवर असलेला बहुतेक डेटा बंगळुरुमधील डिजिटल पेमेंट्स गेटवे जसपे (Juspay) च्या सर्वरवरुन लीक झाला आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात देशातील ७ मिलियन म्हणजेच ७० लाखापेक्षा जास्त यूजर्सच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा लीक झाल्याचा दावा राजशेखर यांनी केला आहे. राजशेखर यांच्या दाव्यानुसार लीक झालेला सर्व डेटा डार्क वेबवर विकला जात आहे. लीक डेटामध्ये भारतीय कार्डधारकांचे संपूर्ण नाव, त्यांचा मोबाइल नंबर, इनकम लेवल्स, ईमेल आयडी, परमनंट अकाउंट नंबर (PAN) आणि कार्डवरील नंबर यांचा समावेश आहे. या सर्वांचा कशाप्रकार लिलाव केला जात आहे याचा सोशल मीडियावर स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे. वाचाः बिटकॉइनद्वारे विकला जातोय डेटा डेटा डार्क वेबवर क्रिप्टो करेंसी (बिटकॉइन) द्वारे अघोषित किमतीवर विकला जात आहे. या डेटासाठी हॅकर टेलीग्रामद्वारे संपर्क करत आहेत. जसपे यूजर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी पेमेंट कार्ड इंडस्ट्री डेटा सिक्योरिटी स्टँडर्ड (PCIDSS) चे पालन करते. जर, हॅकर कार्ड फिंगरप्रिंट बनवण्यासाठी हॅश अल्गोरिथमचा वापर करू शकतात, तर ते मास्कस्ड कार्ड नंबरला डिक्रिप्ट करू शकतात. अशा परिस्थितीत सर्व १० कोटी युजर्सचा डेटा धोक्यात आला आहे. वाचाः Juspay चे स्पष्टीकरण सायबर अटॅकदरम्यान कोणत्याही कार्डचे नंबर किंवा फायनांशिअल डिटेलशी कसल्याही प्रकारची तडजोड झालेली नाही. रिपोर्टमध्ये १० कोटी यूजर्सचा डेटा लीक झाल्याचे बोलले जात आहे, पण प्रत्यक्षात ही संख्या फार कमी आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. १८ ऑगस्ट, २०२० रोजी आमच्या सर्वरपर्यंत अनधिकृतरित्या मेल आल्याची माहिती मिळाली होती, पण या प्रोसेसला तात्काळ थांबवण्यात आले. यामुळे कोणत्याच कार्डचा नंबर किंवा इतर डेटा लीक झाला नाही. काही गैर-गोपनीय डेटा, ईमेल आणि फोन नंबर लीक झाले होते. परंतु याची संख्या १० कोटींपेक्षा कमी आहे, असे कंपनीने म्हटले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JHVyH3