Full Width(True/False)

टेक्नोचा नवा स्मार्टफोन लाँच, ड्यूल सेल्फी सोबत ६४ मेगापिक्सल कॅमेरा, किंमतही कमी

नवी दिल्लीः टेक्नोने बुधवारी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये ड्यूल सेल्फी कॅमेरा सेटअप, ६४ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा यासारखी खास फीचर्स देण्यात आली आहेत. फोनला स्वस्त किंमतीत २० हजारांपेक्षा कमी किंमतीत दोन सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचाः Tecno Camon 16 Premier ची किंमत टेक्नो कॅमॉन १६ प्रीमियरला भारतात १६ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. फोनला ग्लेशियर सिल्वर कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनला १६ जानेवारी पासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हँडसेटला ऑफलाइन रिटेल आउटलेट द्वारे सुद्धा खरेदी साठी उपलब्ध करण्यात येणार आहे. वाचाः Tecno Camon 16 Premier ची वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.८५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन टू बॉडी रेशिया ९० टक्के तर रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ९० टी प्रोसेसर दिला आहे. हँडसेटला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये ड्यूल सेल्फी कॅमेरा सेटअप दिला आहे. दोन सेल्फी कॅमेरा या फोनचे खास वैशिष्ट्ये आहे. फोनच्या पुढच्या बाजुला ४८ मेगापिक्सलचा व ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. तर रियरवर ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा क्वॉड सेटअप दिला आहे. याशिवाय, ८ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचे दोन सेन्सर रियरवर दिले आहेत. कॅमेरा ३० फ्रेम प्रति सेकंदवर ४के व्हिडिओ सपोर्ट करतो. वाचाः टेक्नोच्या या फोनवर पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनची बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर २८ दिवसांची स्टँडबाय टाईम, ४२ तासांचा कॉलिंग टाइम आणि १४० तासांचा म्यूझिक प्लेबॅक टाइम देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XC68Ty