Full Width(True/False)

राखी सावंतची आई हॉस्पिटलमध्ये, ओक्साबोक्शी रडली अभिनेत्री

मुंबई- बिग बॉस- १४ मध्ये सध्या कौटुंबिक आठवडा सुरू आहे. यात प्रत्येक स्पर्धकाला आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला भेटण्याची संधी मिळणार आहे. काल झालेल्या भागात निक्की तांबोळी, अभिनव शुक्ला आणि एली गोनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटतात. आज प्रसारित होणाऱ्या भागात उर्वरित स्पर्धक त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. दरम्यान, तिच्या घरून कोणीही येणार नाही असं सांगून तिचा वेळ रूबीना दिलैकला आधीच देते. पण अचानक राखीची आई व्हिडिओ कॉलद्वारे तिला भेटते. व्हिडिओ कॉलवर आईशी बोलताना राखीला आपले अश्रू रोखता येत नाहीत. आईशी बोलत असताना राखीला कळतं की तिची आई इस्पितळात आहे. यनंतर राखीचं रडणं थांबतच नाही. 'आई तू मला सोडून जाऊ नकोस.. मी तुझ्यासाठी इथे उपवास करेन.. तुझ्याशिवाय माझं या जगात कोणीच नाही..' असं बोलत राखी सतत रडते. तिचं हे रडणं पाहून घरातलेही भावुक होतात. 'मला कालपासूनच अस्वस्थ वाटत होतं.. मी बाहेर येईपर्यंत तू नीट राहा.. मी एकटी आहे आई..' अशी वाक्य बोलून ती ओक्साबोक्शी रडायला लागते. यानंतर राखीची आई तिला धीरानं घ्यायला सांगते. यानंतर राखी आईला तिच्या नवऱ्याबद्दल रितेशबद्दल विचारतानाही दिसली. तसंच या शोच्या माध्यमातून रितेशने सर्वांसमोर यावं असंही राखीने आईला त्याला सांगायला सांगितलं. आगामी भागात त्याचा लहान भाऊ इम्रानला भेटणार आहे. नेहमी रागात आणि चिडचिडा असलेला एजाज यावेळी भावाला भेटल्यावर रडताना दिसणार आहे. यावेळी एजाज त्याचं भावावर आणि वडिलांवर किती प्रेम आहे ते व्यक्त करताना दिसणार आहे. एजाजचा भाऊ त्याला घरात एकटं न राहण्याचा सल्ला देतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bnSZW2