Full Width(True/False)

लंडनमध्ये अडकेल्या संतोष जुवेकरला मिळालं विमानाचं तिकीट; पण...

मुंबई: सध्या लंडनमध्ये सुरू आहे. करोनाच्या नव्या विषाणूनं तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे. परिणामी लंडनहून देशाबाहेर जाणाऱ्या विमानसेवा बंद करण्यात आल्या होत्या. आता काही प्रमाणात विमानसेवा सुरु झाली आहे. त्यातीलच एका विमानाचं आजचं तिकीट अभिनेता संतोष जुवेकरला मिळालंय. पण, त्याची चिंता एवढ्यावर संपलेली नाही. हे विमान कधीही रद्द होऊ शकतं. त्यामुळे संतोष सध्या एकच प्रार्थना करतोय की, 'विमानानं मला घेऊन मुंबईच्या दिशेनं यावं आणि मला सुखरुप माझ्या भूमीकडे न्यावं. ' महिन्याभरापूर्वी संतोष त्याच्या आगामी मराठी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला होता. चित्रीकरणानंतर संतोष तिथेच राहत होता. त्यानंतर अचानक तेथे लॉकडाउन जारी झाल्यानं तो भारतात परत येऊ शकला नाही. मुंबईला परत येण्याबाबत संतोषनं 'मुंटा'ला सांगितलं की, 'गेला आठवडाभर मी भारतात येणाऱ्या विविध विमानाचं तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात होतो. सुदैवानं आजचं म्हणजेच ८ जानेवारीचं एक तिकीट मला मिळालंय. आता विमानाचं उड्डाण रद्द होऊ नये; हीच प्रार्थना आहे. मला मुंबईला परत यायचंय.' चित्रीकरणासाठी गेलेल्या संतोषचा लंडनमधला मुक्काम लॉकडाउनमुळे वाढला होता. आता मात्र तो परतीच्या प्रतीक्षेत आहे. भारत, इराण, कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली होती. अमेरिकेनेही बहुतांश बिगरअमेरिकी प्रवाशांवर निर्बंध घातले होते. सौदी अरेबिया, कुवेत आणि ओमान या देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर पूर्णपणे बंदी घातली होती. आतापर्यंत युरोपीय महासंघातील सर्व सदस्य देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35nanXg