नवी दिल्लीः इंडियन स्मार्टफोन मेकर लावा मोबाइल्सने आज आपला नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहे. यासोबतच कंपनीने देशात आपला पहिला स्मार्टबँड befit ला सुद्धा लाँच केले आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, या बँड द्वारे हार्ट रेट, बॉडी टेम्परेचर आणि ब्लड ऑक्सिजन लेवलला ट्रॅक केले जावू शकते. ची भारतात किंमत २६९९ रुपये ठेवण्यात आली आहे. याची विक्री अॅमेझॉन इंडिया, लावाची वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोर्सवरून २६ जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. वाचाः Lava befit कंपनीचा पहिला स्मार्टबँड आहे. याचे फीचर्स जबरदस्त आहेत. यात ब्लड ऑक्सिजन लेवल मॉनिटर करण्यासाठी SpO2 सेंसर दिला आहे. तसेच यात हार्ट रेट ट्रॅकिंगचे फीचर सुद्धा दिले आहे. या बँड द्वारे युजर्स बॉडी टेम्परेचर सुद्धा मॉनिटर करू शकतात. हे स्मार्टबँड तुमची पूर्ण दिवसभर अॅक्टिविटी करू शकतात. तसेच यात कॉल्स, एसएमएस, ई-मेल्स आणि सोशल मीडिया मेसेज अलर्ट्स मिळतील. या बँडमध्ये ऑटो स्लीप फीचर्सचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. वाचाः लावा मोबाइल्सने आज एका ऑनलाइन इवेंटचे आयोजन केले होते. ज्यात नवीन स्मार्टफोन्स आणि या फिटनेस बँडला लाँच केले आहे. कंपनीने Lava Z1 ला ग्राहकांसाठी बाजारात उतरवले आहे. ज्यांना फीचर फोनमधून स्मार्टफोनमध्ये शिप्ट व्हायचे आहे. या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपये आहे. याचप्रमाणे कंपनीने Lava Z2, Z4 आणि Z6 कस्टमाइजेबल फोन्सला सुद्धा लाँच केले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hMZTFC