नवी दिल्लीः मेड इन इंडिया कंपनी लावाने आज भारतात आपली Z Series चे ४ स्मार्टफोन लाँच केले आहेत. कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स या फोनमध्ये दिले आहेत. लावाच्या या सीरीज ने myZ मोबाइलला कस्टमाइज करण्याचा ऑप्शन दिले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार लावा मोबाइलच्या फीचर्स आणि डिझाइन ठेवू शकता. लावाचा दावा आहे की, या सीरीजमधील सर्व मोबाइल्स पूर्ण पणे मेड इन इंडिया आहेत. वाचाः च्या फोनची किंमत लावा मोबाइल्सने भारतात ला २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपये ठेवली आहे. ला २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. ला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. Lava Z6 ला कंपनीने ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. यासोबच कंपनीने Lava Befit SmartBand ला लाँच केले आहे. याची किंमत २ हजार ६९९ रुपये आहे. वाचाः सेल कधी सुरू होणार लावाने ग्राहकांच्या सुविधा ध्यानात ठेवून myZ स्मार्टफोन्सची सुविधा दिली आहे. यात तुम्ही तुमची मनपसंत डिझाइन व वैशिष्ट्ये सोबत कस्टमाइज करू शकतात. यात ६० हून जास्त ऑप्शन दिले आहेत. Lava Z Series च्या या स्मार्टफोन्स मध्ये Z2, Z4, Z6, आणि MyZ स्मार्टफोन्सची विक्री ११ जानेवारी पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरवर सुरू होणार आहे. तर Lava Z1 आणि Z Up ची २६ जानेवारी पासून विक्री सुरू होणार आहे. वाचाः Z1 सीरीज स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये Lava Z Series मध्ये एन्ट्री लेवल स्मार्टफोन झेड वनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये octa-core MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला आहे. ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरासोबत ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. लावाच्या या लेवल फोनमध्ये 3100mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pZ51cE