Full Width(True/False)

OnePlus चा फिटनेस बँड आज भारतात लाँच होणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः OnePlus ने नुकते सांगितले होते की, कंपनी नावाचा एक फिटनेस ट्रॅकर बनवत आहे. कंपनीने या फिटनेस ट्रॅकरचा एक टीझर जारी केला होता. आता कंपनीने खुलासा केला आहे की, OnePlus Band ११ जानेवारी रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. वाचाः वनप्लस बँडला अॅमेझॉनवर टीज करण्यात आले आहे. या टीजरवरून उघड झाले आहे की, याची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर उपलब्ध होणार आहे. याशिवाय, वनप्लस फीटनेस बँडला ऑपलाइन स्टोर्सवर सुद्धा उपलब्ध करण्याची शक्यता आहे. वाचाः कंपनीने सध्या तुर्तास आगामी फिटनेस ट्रॅकर शी संबंधित कोणतीही माहितीचा खुलासा केला नाही. परंतु, रिपोर्ट्सवरून हे संकेत मिळत होते की, भारतीय बाजारात याची किंमत २ हजार ४९९ रुपयात लाँच केले जावू शकते. एका लेटेस्ट लीक वरून माहिती उघड झाले आहे की वनप्लस बँडमध्ये १.१ इंचाचा अमोलेड डिस्प्ले असणार आहे. जो टच सपोर्ट सोबत येईल. तसेच याशिवाय, बँडमध्ये रियल टाइम हार्ट टाइम रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन लेवल मॉनिटरिंग साठी SpO2 सेंसर आणि स्लीप मॉनिटरिंग फीचर असल्याची माहिती समोर आली आहे. वाचाः या बँडमध्ये स्पोर्ट्स आणि एक्सरसाइज ट्र्रॅकिंग साठी १३ वेगवेगळ्या मोड असण्याची शक्यता आहे. डिव्हाइस IP68- सर्टिफिकेशन सोबत डस्ट आणि पाण्यापासून सुरक्षित असणार आहे. रिपोर्टवरून हेही उघड झाले आहे की, डिव्हाइस सिंगल चार्जवर १४ दिवसांची बॅटरी लाइफ मिळणार आहे. वनप्लस बँडला बाजारात पहिले असलेल्या फिटनेस डिव्हाइसशी मोठा सामना करावा लागतो. यात शाओमी, रियलमी, ऑनर, आणि अन्य दुसऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. या ब्रँड्सच्या बँड सुद्धा या किंमतीच्या कॅटेगरीत बाजारात उपलब्ध आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39oq0Pe