Full Width(True/False)

Paytm अॅप तुमची किती माहिती कलेक्ट करते, माहिती आहे का?

नवी दिल्लीः चीनी कंपनी Ali Baba बॅक्ड भारतीय अॅप चे फाउंडर विजय शेखर शर्मा यांनी लोकांना आवाहन केले आहे की, चा वापर करू नका. त्यांनी WhatsApp च्या ऐवजी सिग्नल अॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, यामागे कारण काय आहे. वाचाः WhatsApp प्रायव्हसी वरून सध्या जगभरात वाद उभा राहिला आहे. अनेक जणांनी नवीन पॉलिसीला विरोध केला आहे. परंतु, Paytm चे फाउंडर विजय शेखर शर्मा हे व्हॉट्सअॅपवरून आधीही बोलले आहेत. WhatsApp ने पेमेंट सर्विसची घोषणा केलेली आहे. त्यामुळे Paytm विरुद्ध WhatsApp हे दोन्ही प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे पेटीएमचे विजय शेखर शर्मा हे व्हॉट्सअॅपवर बोलण्याची संधी सोडत नाहीत. त्यांनी म्हटले होते की, व्हॉट्सअॅप पेमेंट सुरक्षित नसेल, कारण त्यात लॉग इन आउट सारखी कोणतीही गोष्ट नाही. वाचाः Paytm चे सीईओ लोकांना व्हॉट्सअॅप न वापरण्याचा सल्ला का देत आहे, हे आता अनेकांना समजले असणार. व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी वरून सध्या वाद उभा राहिला आहे. परंतु, पेटीएम अॅप तुमचा कोणकोणता डेटा कलेक्ट करतो हे तुम्हाला माहिती आहे का? अॅपल अॅप स्टोरवर नुकतीच प्रायव्हसी लेबलची सुरुवात करण्यात आली आहे. अॅप स्टोरवर कोणताही अॅप सर्च करुन तुम्ही हे अॅप तुमची कोणती कोणती माहिती घेत असते, हे पाहता येते. अॅपल अॅप स्टोरवर Paytm च्या प्रायव्हसी लेबलच्या माहितीनुसार, हे अॅप युजरचे लोकेशन ट्रॅक करत असते. तसेच कॉन्टॅक्टची माहिती, आणि कॉन्टॅक्टची डिटेल्स सुद्धा पेटीएमकडे असते. कारण, यावरूनच अकाउंट बनते. त्यावरून तुम्ही पेमेंट करीत असतात. वाचाः Paytm अॅप युजर्सची फायनान्शियल माहिती, लोकेशन, कॉन्टॅक्ट माहिती, (नाव, फोन नंबर), कॉन्टॅक्ट आणि युज करीत असलेली माहिती जसे, फोटोज आणि व्हिडिओजचे अॅक्सेस घेवू शकते. पेटीएमवर सरकारसोबत युजरचा डेटा शेयर करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. २०१८ मध्ये कोबरा पोस्टच्या स्टिंग नंतर रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला होता की, पेटीएम सरकारसोबत युजरचा डेटा शेयर करीत आहे. पेटीएम सरकारच्या मोहीमेला प्रोमोट करीत असल्याचे या स्टिंग व्हिडिओ मध्ये पेटीएमचे अधिकारी बोलताना दिसले होते. कोबरा पोस्टच्या या स्टिंग मध्ये पेटीएम सीईओ विजय शेखर शर्माचे छोटे बंधू सुद्धा होते. या स्टिंग ऑपरेशन नंतर पेटीएमला विरोधी पक्षाकडून लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर पेटीएमने स्पष्टीकरण दिले होते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35zeks3