Full Width(True/False)

Whatsapp नसेल तर 'हे' ५ मेसेजिंग अॅप्स वापरू शकता, फीचर्स जबरदस्त

नवी दिल्लीः ने इंस्टेंट मेसेजिंग अॅप प्रायव्हसी पॉलिसीत बदल केला आहे. ८ फेब्रुवारी पर्यंत युजर्संनी व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी अॅक्सेप्ट केली नाही तर त्यांचे अकाउंट रद्द केले जाणार आहे. यामुळे अनेक जणांना नाराजी व्यक्त करीत व्हॉट्सअॅपला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक जण टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या अॅपकडे जात आहेत. जर तुम्हाला व्हॉट्सअॅपची पॉलिसी पसंत पडली नसली तरी दुसरे पर्याय आहेत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः टेलिग्राम ( Telegram) हे एक क्लाउड आधारित मेसेजिंग अॅप आहे. हे अॅप मेसेजिंग आणि व्हाइस कॉल्ससाठी एंड टू एड एनक्रिप्शन उपलब्ध करते. या अॅपद्वारे युजर्स १.५ जीबी पर्यंत फाइल्स दुसऱ्या युजर्सला पाठवू शकतात. तर एका ग्रुपमध्ये २ लाख युजर्सपर्यंत अॅड करु शकतात. हे एक अँड्रॉयड, आयओएस, विंडोज, विंडोज एनटी, मॅक ओएस आणि लिनक्स सॉफ्टवेयर वर काम करते. वाचाः सिग्नल ( Signal) हे अॅप अँड्रॉयड, आयओएस, विंडोज, मॅक ओएस आणि लिनक्स सॉफ्टवेयरवर काम करते. सिग्नल अॅप आयपॅडवर सुद्धा काम करते. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी लोकांना हे अॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सिग्नलने व्हॉट्सअॅपला भारतात अॅप स्टोरवर टॉप फ्री अॅप्सच्या यादीत मागे टाकले आहे. ही यादी जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँगकाँग आणि स्वित्झर्लंडमधील होती. वाचाः वायबर ( Viber) हे एक मेसेज आणि व्हाइस कॉल्ससाठी एंड टू एन्ड एनक्रिप्शन उपलब्ध करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुरक्षिततेसाठी नवीन व्हर्जनचा वापर केला जात आहे. व्हॉट्सअॅपप्रमाणे याची चॅट्स सुद्धा गुगल ड्राइव्ह वर घेता येवू शकते. या ठिकाणी आपली चॅट्स रिस्टोर करु शकता. वाचाः थ्रिमा ( Threema) या अॅपसाठी २७० रुपयांची शुल्क द्यावे लागते. या अॅपमध्ये युजर्सला टेक्स्ट आणि व्हाइस मेसेजेस सह व्हाइस आणि व्हिडिओ कॉल करता येवू शकते. यासाठी ग्रुप चॅट्स आणि फाइल शेयरींग करता येवू शकते. या युजर्सला एक रँडम थ्रिमा आयडी दिली जाते. यावर काम करता येवू शकते. यात फोन नंबर आणि ईमेलची गरज पडत नाही. विना सीम कार्ड या अॅपला टेबलेट आणि डेस्कटॉपवर वापर करता येवू शकते. वाचाः इलेमेंट ( Element) हे एक अँड्रॉयड, आयओएस, विंडोज, मॅक ओएस आणि लिनक्स सॉफ्टवेयरवर काम करते. हे एक एंड टू एंड एनस्क्रिप्शन उपलब्ध करते. या अॅपमध्ये अडवान्स्ड कम्यूनिकेशन टूल्स दिले आहेत. याद्वारे फाइल शेयर केली जावू शकते. तसेच व्हिडिओ चॅट सह स्क्रीन शेयर केली जावू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38AQii5