मुंबई- बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्री बॉलिवूडमधील पावर कपल म्हणून ओळखले जातात. दोघं एकमेकांसोबत खूप सुंदर दिसतात. त्यांची जोडी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. आज २४ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांच्या लग्नाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाला जरी २२ वर्ष झाली तरी ते जवळपास २६ वर्ष एकमेकामसोबत आहेत. त्यांनी प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घेतलं. कठीण परिस्थितीत ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहीले. लग्न करण्यापूर्वी त्यांनी चार वर्ष एकमेकांना डेट केलं. एकमेकांना समजून घेऊन ते २४ फेब्रुवारी १९९९ साली लग्नबंधनात अडकले. आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजयने त्याची पत्नी काजोलला अत्यंत हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. अजयने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात एक वाइनची बाटली दिसत आहे. ती फक्त एक बाटली नसून त्यावर काजोल आणि अजयचा एक हसरा फोटोदेखील आहे. ज्यामुळे हा फोटो खास आणि हटके बनलाय. बाटलीवर लिहीलंय, 'बॉटल इन १९९९ ऑनली एडिशन.' या फोटोसोबत अजयने कोणतंही कॅप्शन दिलं नसलं तरी, त्याने काजोलला या फोटोत टॅग केलं आहे. ज्यावरून त्याच्या मनातलं काजोलवरील प्रेम दिसून येतंय. काजोल आणि अजय यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेचं आहे. त्यांची पहिली भेट 'हलचल' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तेव्हा ते दोघे एकमेकांकडे पाहतही नव्हते. त्यानंतर ते एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्याचं रूपानंतर लग्नात झालं. अजय आणि काजोल यांची जोडी त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणा आहे. त्यांनी सगळ्यांसमोर त्यांच्या यशस्वी नात्याचं उदाहरण ठेवलं आहे. त्यांना दोन मुलं असून मुलगी न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ky5Wzn