मुंबई- छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. या कार्यक्रमात प्रत्येक पात्राची एक वेगळी जागा आहे. त्यातही बबिताजी आणि यांच्या एकतर्फी प्रेमाची कहाणी प्रेक्षकांना भलतीच पसंत पडते. परंतु, म्हणजेच मुनमुन दत्ताचा हे पात्र मिळवण्याचा प्रवास काही साधा नव्हता. बबिताचं पात्र जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांच्या आसपास फिरत असल्याचं पाहायला मिळतं. कार्यक्रमात दिसणारी बबिता ही खऱ्या आयुष्यात अत्यंत वेगळी आहे. मुनमुन मालिकेच्या सुरुवातीपासूनचं या कार्यक्रमाचा भाग आहे. २००४ साली मुनमुनने तिच्या अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात केली. तिला गायिका बनविण्यासाठी तिच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असताना मुनमुन मात्र अभिनय क्षेत्राकडे वळली. तिने सुरुवातीला मॉडेल म्हणून नाव कमावलं. मुनमुनला तिच्या अभिनय क्षेत्रातील सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तिला सुरुवातीला काही बी ग्रेड चित्रपटांमध्येही काम करावं लागलं. ३३ वर्षांची मुनमुन अजुनही अविवाहित आहे. मालिकेच्या चित्रीकरणावेळी कोणीही स्पर्श केला तिला आवडत नाही. जर कोणी तसा प्रयत्न केला तर तिच्या रागाचा पारा चढतो. अनेकदा तर, या कारणांमुळे तिने चित्रीकरण करण्यास नकार दिला आहे. जेव्हा मुनमुनला 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये अय्यरच्या पत्नीची भूमिका देण्यात आली होती, तेव्हा तिने ही भूमिका करण्यास नकार दिला होता. परंतु, दिलीप जोशी यांनी तिची समजूत घातल्यानंतर ती हे पात्र साकारण्यासाठी तयार झाली होती. आता मात्र मुनमुन प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qQFt1Z